Pune Covid19 update: गणेशोत्सवात नवीन निर्बंध नाहीत, पण... saam tv
मुंबई/पुणे

Pune Covid19 update: गणेशोत्सवात नवीन निर्बंध नाहीत, पण...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर आज पुण्यात अजित पवार यांच्या नेतृत्त्वात कोरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Covid 19 updates:

''पुण्यात नव्याने निर्बंध (restrictions) लावणार नाहीत, पण गर्दी (Rush) वाढली तर कठोर निर्णय घेतले जाणार. तशी वेळ आपण आणू नये, असा इशारा आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणेकरांना दिला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर आज पुण्यात अजित पवार यांच्या नेतृत्त्वात कोरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

हे देखील पहा-

कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर त्यांनी आज आढावा बैठकीत तिसऱ्या लाटेवर तज्ञांशी चर्चा केली.'' गणेशोत्सवाच्या काळात गर्दी कमी झाली नाही तर गर्दी कमी झाली नाही तर पुन्हा निर्बंध लावण्यात येतील. अद्यापही ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर लसीकरणावर भर देण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी देशातील वाढत्या महागाईवरुन केंद्रसरकारवर निशाना साधाला. ''केंद्रसरकारने अच्छे दिन आणणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी देशातील जनतेने त्यांनी दुसऱ्यांदा निवडून दिले, पण गॅस आणि पेट्रोल-डिजेल दर वाढले. कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प् झाले. लाखो लोक बेघर झाले. आतातरी केंद्रसरकराने लक्ष देऊन महागाई आवाक्यात ठेवायला हवी होती. यासाठी आंदोलने, इशारे देऊनही काही झालं नाहीच.'' असही त्यांनी यावेळी म्हटलं.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT