Narayan Rane : 'यांंनी' दिली राणेंच्या बंगल्याची अधिकाऱ्यांना माहीती! Saam TV
मुंबई/पुणे

Narayan Rane : 'यांंनी' दिली राणेंच्या बंगल्याची अधिकाऱ्यांना माहीती!

पालिकेने राणे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्यांना नोटीस दिली आहे तर आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा राणे कुटुंबियांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू परिसरातील अधीश या बंगल्यावरही कारवाईबाबत मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली होती. पालिकेने राणे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्यांना नोटीस दिली आहे तर आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा राणे कुटुंबियांनी केला आहे.

अशातच आज महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बंगल्याची (Narayan Rane Bungalow) पाहणी करण्यात आली राणेंच्या बंगल्याचे वास्तुविशारद ज्यांनी या बंगल्याचे डिझाइन केले त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना सर्व माहिती दिली असल्याची माहीती समोर आली आहे.

आज या अधिकाऱ्यांनी सुरुवातीची 15 मिनिटं नारायण राणेंशी (Narayan Rane) बोलले यावेळी त्यांचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे देखील उपस्थित होते. त्यानंतर वास्तुविशारदाने सर्व माहिती आणि पेपर ठेवत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची बातमी साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणेंच्या सर्वच्या सर्व 8 मजल्यांचीही पाहणी करत फोटो आणि व्हिडीओ काढले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

SCROLL FOR NEXT