Devendra Fadnavis: काही लोकांसाठी मराठवाडा फक्त भाषणापुरता, फडणवीसांचा शिवेसनेवर हल्लाबोल

आमच्या मनात मराठवाडा आहे. मात्र काही लोकांना मराठवाडा फक्त भाषणापुरता आहे.
devendra fadnavis
devendra fadnavis saam tv
Published On

अविनाश कानडजे -

औरंगाबाद: 'आमच्या मनात मराठवाडा आहे. मात्र काही लोकांना मराठवाडा फक्त भाषणापुरता आहे. त्यांच्या मनात मराठवाडा नाही', असं म्हणत भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडलं. ते औरंगाबादेत बोलत होतेन (BJP leader Devendra Fadnavis criticize Shivsena over water scheme and not helping farmers).

devendra fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज नाशिक, औरंगाबाद दौऱ्यावर

महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी तसेच लाभार्थी मेळावा आणि 120 कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ सोहळा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गंगापुर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे सुरू झाला आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

अभिनव कार्यक्रम आयोजित केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ई-श्रम कार्ड सुरु केल्याने कामगारांना फायदा होईल. कामगारांना किट वाटप, सायकल वाटप, मशरुमबाबत मदत अशा 45 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे हा रेकॉर्ड असेल.

प्रत्येकाकडे समृद्धी पोहचली पाहिजे. शौचालय, गॅस, विज वेगवेगळ्या योजना गरिबांना भेटाव्या त्यासाठी मोदीजींनी योजना सुरु केल्या. कामगारांना संघटित केले. त्यांचे इ-श्रम कार्ड घरोघरी पोहचण्याचे काम केल जात आहे.

आमच्या मनात मराठवाडा आहे. मात्र काही लोकांना मराठवाडा फक्त भाषणापुरता आहे. त्यांच्या मनात मराठवाडा नाही, वैधनिक विकास गेला, आम्ही मराठवाड्याचा विकास लक्षात घेऊन दुष्काळ भागात पाणी आणण्याचा प्रयत्न केला. दुष्काळ घालवण्यासाठी वाटरग्रीड योजनेचा खून केला, हळूहळू विष देऊन मारलं,

ज्या शहराने शिवसेनेला ओळख दिली, तिथली पाणी योजना आम्ही आणली मात्र ती देखील पूर्ण होऊ शकली नाही. शेतकऱ्यांसमोर अडचणी आल्या मात्र या सरकारने त्यांना मदत केली नाही. आमच्या सरकारने प्रत्येक संकटात शेतकऱ्यांना मदत केली. मात्र, आताच सरकार हरवलं आहे, त्यांना मराठवाडा कुठे आहे हे माहित नाही, अशी घणाघाती टिका फडणवीसांनी केली.

शेतकऱ्यांची विज कापली जात आहे, अनेक धनाढ्य लोक विजबील भरत नाहीत. मंत्री म्हणतात विज वापरली तर बिल भरावं लागेल. तुमची पगार दोन अडीच लाख आहे, तर ते सरकार बिल भरते, तुम्हाला काय कळणार. सरकार तर्फे एक तरी प्रवक्ता गोगजरिबांवर बोलला आहे का, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com