pm narendra modi, uddhav thackeray, Shivsena On BJP Saam Tv
मुंबई/पुणे

'ऑपरेशन लोटस'ची तुलना थेट अल -कायदासोबत, शिवसेनेचा सामनामधून भाजपवर हल्लाबोल

सामनाच्या अग्रलेखातून भाजपची सध्याची परिस्थिती सांगत शिवसेनेनं सडकून टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवरून शिवसेनेने (Shivsena) भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने सामना या मुखपत्रातून भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने 'ऑपरेशन लोटस'ची तुलना दहशतवादी संघटना अल कायदाशी केली आहे. भाजपचा संबंध दहशतवादाशी जोडण्यात आला आहे, असे आरोप शिवसेनेने केले आहेत. शिवसेनेने आपल्या लेखात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दाखलाही दिला आहे. "आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्यासाठी करण्यात आलेले ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आहे.", असंही यात म्हटले आहे.

सरकार निवडणून आणण्याऐवजी विरोधकांचे सरकार पाडण्याचा आणि पक्ष फोडण्याच्या राजकीय घटना सध्या देशात जास्त घडत आहेत. त्यामुळे विष्णूचे आवडते फूल 'कमळ' बदनाम झाल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

'ऑपरेशन लोटस' ही अल-कायदासारखी दहशतवादी संज्ञा बनली आहे. दिल्ली सरकार पाडण्यासाठी सुरू करण्यात आलेले ऑपरेशन अपयशी ठरल्याचे शिवसेने म्हटले आहे. सामनामध्ये बिहारचाही उल्लेख केला आहे, सध्या बिहारमध्ये सरकार बदलले आहे. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी चंद्रशेखर राव यांनी अमित शहांना 'ईडी, सीबीआय (CBI) वगैरे लादून माझे सरकार पाडून दाखवा' असे खुले आव्हान दिले आहे, असंही लेखात म्हटले आहे.

ईडी, सीबीआयचा (CBI) वापर करून केजरीवाल सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली सरकारचे मद्य धोरण, उत्पादन शुल्क धोरण, दारू विक्रेत्यांना दिलेली कंत्राटे, हे भाजपच्या दृष्टिकोनातून टीकेचे विषय असतील पण हा निर्णय वैयक्तिक नव्हता. संपूर्ण सरकार सोबत होते. दिल्लीचे राज्यपाल यांचीही या निर्णयांना सहमती होती. मात्र मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे सर्व खापर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर फोटण्यात आले आहे. त्यांच्यावर सीबीआयचे छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणात त्यांना क्रमांक एकचे आरोपी बनवण्यात आले आहे, असा आरोपही यात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT