Ambernath Company Friends News Saam TV
मुंबई/पुणे

कंपनीतील मित्राची मस्ती तरुणाच्या जीवावर बेतली; पार्श्वभागात घातला हायप्रेशर हवेचा पाईप अन्...

कंपनीतील मित्राची मस्ती एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमधील एका कंपनीत घडली आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : कंपनीतील मित्राची मस्ती एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमधील एका कंपनीत घडली आहे. कंपनीतील एका तरुणाने आपल्या मित्राच्या पार्श्वभागात कंपनीतील हायप्रेशर असणाऱ्या हवेचा पाईप घातल्यामुळे तरुणाला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत झाली असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अंबरनाथच्या (Ambernath) वडोळ गाव परिसरातल्या एका कंपनीत पीडित तरुण काम करतो. गुरुवारी रात्रीपाळीला हा तरुण कामावर आला होता. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा तरुण कंपनीत मशीनवर काम करत असताना त्याचा एक सहकारी मित्र तिथे आला आणि मस्ती म्हणून हवेचा हायप्रेशरचा पाईप या तरुणाच्या पार्श्वभागात घातला.

पाहा व्हिडीओ -

यामुळे ही हायप्रेशरची हवा तरुणाच्या आतड्यांमध्ये जाऊन त्याला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत झाली आणि तो क्षणार्धात खाली कोसळला. यावेळी त्याच्या त्याच मित्राने त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये (Hospital) नेलं. या तरुणाला तपासल्यानंतर त्याचं तातडीने ऑपरेशन करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

सध्या त्या प्रकृती अतिशय नाजूक आहे. शिवाय जखमी तरुणाने हा प्रकार आपल्या मित्राच्या मस्तीने घडला असून आपल्याला कोणतीही तक्रार करायची नसल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. मात्र या प्रकारामुळे आपली मस्ती एखाद्याच्या कशी जीवावर बेतू शकते, हे समोर आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friendship Day 2025 : पाऊस, गरमागरम चहा अन् मित्रांची साथ, मुंबईतील ८ बेस्ट पिकनिक स्पॉट

Asha Bhosle: आशा भोसलेंनी विकला पुण्यातील आलिशान अपार्टमेंट; ४२% पेक्षा जास्त झाला नफा, मिळाले कोट्यवधी रुपये

Shani Rahu Remedy : कोणत्या प्राण्याची सेवा केल्याने कोणते ग्रह शांत होतात?

राज-उद्धव एकत्र येऊन चालणार नाही...; संजय राऊत नेमकं काय बोलून गेले? पाहा व्हिडिओ

Solapur Crime : जेवत नाही, शाळेत जात नाही म्हणून राग; सावत्र आईने ३ वर्षांच्या चिमुकलीला संपवलं

SCROLL FOR NEXT