Breaking News: चांदिवाल आयोगाकडून परमबीर सिंहांना शेवटची संधी Saam TV
मुंबई/पुणे

Breaking News: चांदिवाल आयोगाकडून परमबीर सिंहांना शेवटची संधी

चांदिवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांना शेवटची संधी देण्यात आली आहे. न्यायालयाने पून्हा परमबीर सिंह यांच्या विरोधात जामीनपात्र वॅारंट पाठवण्यात आला होता.

सुरज सावंत

मुंबई: चांदिवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांना शेवटची संधी देण्यात आली आहे. न्यायालयाने पून्हा परमबीर सिंह यांच्या विरोधात जामीनपात्र वॅारंट पाठवण्यात आला होता. हा अहवाल महाराष्ट्र पोलिसांनी सादर केला. परमबीर यांचे तीन घर असून त्या ठिकाणी त्यांनान जामीनपात्र वारंट पाठवलं होता. या तिनही ठिकणी परमबिर सिंह सापडले नाहीत. यावर देशमुख यांच्या वकिल अनिता शेखर कॅस्टिरोल यांनी कायदयातील प्रोविजन नुसार वारंवार बोलवूनही परमबिर हजर रहात नसल्याने त्यांची प्राँपर्टी जप्त करावी व अजामीन पात्र वारंट जारी करण्याची मागणी केली. आज न्यायालयाने पून्हा एकदा शेवटची संधी देत, जामीन पात्र वारंट पाठवण्याचे आदेश देत, या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोंबरला ठेवलेली आहे.

दरम्यान मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param bir singh) या़च्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपुर्वी ACB ने परमबीर सिंह यांच्याविरोधात आणखी एका प्रकरणात खुली चौकशी करण्याची परवानगी गृहविभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली आहे. त्यामुळे आता सिंह यांच्याविरोधात दुसरी खुली चौकशी सुरू करण्याचा एसीबीचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी पोलिस निरीक्षक अनुप डांगे प्रकरणात सिंह यांच्याविरोधात चौकशीला गृहविभागाने मान्यता दिली होती.

पोलिस निरीक्षक बी.आर.घाडगे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला लेखी पत्र लिहून परमबीर सिंह यांच्याविरोधात बेकायदा कृत्य व भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये कमवल्याचा आरोप केला होता. 14 पानी या पत्राची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, महासंचालक कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना पाठवण्यात आली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये पावसाचा फटका; पुणे-नाशिक महामार्ग जलमय, वाहतूक विस्कळीत

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा?

६६१ कोटा घोटाळा प्रकरण; निवृत्तीच्या ४ दिवसाआधी IAS अधिकारी फरार, मोबाईलही बंद

मुसळधार पावसाने उडवली धांदल; यवतमाळ-बुलढाणा-वाशिममध्ये पूरसदृश्य स्थिती

Crime News: आजारी पत्नीला औषधाऐवजी पाजलं विष; पाच महिन्यांनंतर उलगडलं हत्येचं गूढ, पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT