Mumbai loca train  - Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath News: रेल्वे पोलिसांची कमाल! लोकलमध्ये गहाळ झालेला लॅपटॉप पाऊण तासांत शोधून काढला

Ambernath News: रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे केवळ पाऊण तासांत लोकलमध्ये गहाळ झालेली लॅपटॉपची बॅग प्रवाशाला मिळाली आहे

अजय दुधाणे

Ambernath News:अंबरनाथहून सकाळी ठाण्याच्या दिशेने लोकल प्रवास करणारे प्रवासी किरण यादव हे त्यांची लॅपटॉप आणि काही महत्वाचे साहित्य असणारे बॅग लोकलमध्ये विसरले. रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे केवळ पाऊण तासांत लोकलमध्ये गहाळ झालेली लॅपटॉपची बॅग प्रवाशाला मिळाली आहे. (Latest Marathi News)

अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात किरण यादव राहतो. आज सकाळी नेहमीप्रमाणे किरण यांनी अंबरनाथ येथून १०.३५ ची बदलापूर-सीएसएमटी लोकल गाडीने प्रवास सुरु केला. मात्र ठाणे स्थानकात उतरल्यावर त्यांची बॅग गाडीतच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र तो पर्यंत गाडी निघून गेली असल्याने त्यांना बॅग घेणे शक्य झाले नाही.

यानंतर त्यांनी लागलीच १५१२ या रेल्वे पोलिसांच्या मदत क्रमांकावर संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.यानंतर ठाणे रेल्वे पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक पंढरी कांदे आणि मुंबई रेल्वे पोलीस दलाचे निरीक्षक विजय तायडे यांनी रेल्वे पोलिसांना सूचना देत संबंधित लोकलची तपासणी करण्याचे आदेश दिले.

यावेळी पोलिसांनी मस्जिद बंदर येथे लोकलधून बॅग ताब्यात घेतली.यानंतर किरण यादव यांना मस्जिद बंदर येथील रेल्वे पोलीस स्थानकात बॅग स्वाधीन केली. बॅगमध्ये सुमारे ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि इतर काही महत्वाचे साहित्य होते. केवळ पाऊण तासाच्या कालावधीत बॅग मिळाल्याने किरण यांनी पोलिसांचे आभार मानले.

दरम्यान, किरण यादव यांना त्यांचा लॅपटॉप मिळाल्याने रेल्वे पोलिसांचं कौतुक होत आहे. रेल्वे पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्री बाबा यांच्या विरोधात आंदोलन

Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

अखेर प्रतीक्षा संपली! डोंबिवलीतील रेतिबंदर पूल आता लवकरच उभा राहणार

Maza Shambhu Raja Rap Song : छत्रपती संभाजी महाराजांची गाथा आता 'शंभू राजा' रॅपमधून नव्या अंदाजात, संगीतकार ब्रम्हाचा अनोखा प्रयोग

कलिंगड खाल्ल्यानंतर अख्खं डोकाडिया कुटुंब संपलं; पायधुनीमधील एकाच घरातील चौघांचा मृत्यू कशामुळे झाला? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT