landslide in kurla saam tv
मुंबई/पुणे

Kurla: अंजुमन स्कूल समोर दरड काेसळली; एक महिला ठार; Video पाहा

या घटनेनंतर परसिरात खबरादारी घेण्यात आली आहे.

जयश्री मोरे

कुर्ला : कुर्ला पश्चिम आंबेडकर नगरच्या बाजूला गरीब मोहल्ला येथे घरावर दरड कोसळली आहे. या घरातील महिला लता रमेश साळुंखे (वय ५६) या जखमी झाल्या हाेत्या. त्यांना कुर्ला नर्सिंग होम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेत त्याचे पती रमेश आणि मुलगा अमित यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. इतर कोणीही जखमी नाहीत. या घटनेनंतर आजूबाजूच्या घरातील लोकांना घरे खाली करावयास सांगून त्यांना सुखरूप ठिकाणी हलविण्यात आले आहे. ही झोपडपट्टी एका विकासकाने विकास करण्यासाठी घेतली असून अनेक वर्षापासून या ठिकाणी काम रखडले असल्याचं नागरिक सांगत आहे.

घटनास्थळी कुर्ला पोलीस ठाणेचे कर्मचारी आले आहेत. या भागात योग्य तो बंदोबस्त लावला आहे. फायर ब्रिगेडची वाहने देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्राजक्त तनपुरेंची माघार, शरद पवारांनी शेवटच्या अर्ध्या तासात सूत्रे फिरवली, राहुरीत या शिलेदाराला दिली उमेदवारी

Maharashtra News Live Update: दोन गटात तुफान हाणामारी, गोरेगावात तणावाचे वातावरण

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! पक्षाच्या स्थापना दिवशीच कोसळला दु:खाचा डोंगर; राजकीय वर्तुळात शोककळा

Shivali Parab Photoshoot: कल्याणच्या चुलबुलीचा परदेशात जलवा, हे 5 फोटो पाहून व्हाल थक्क

सुनेत्रा पवारांच्या विरोधात २० पेक्षा जास्त अर्ज, एकनाथ शिदेंकडून पहिली प्रतिक्रिया, थेट बारामतीकरांना म्हणाले...

SCROLL FOR NEXT