prasad debhe saam tv
मुंबई/पुणे

Diveagar Shrivardhan Coastal Road : दिवेआगर श्रीवर्धन वाहतूक बंद, पाेलीसांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Landslide दम्यान दरड काढण्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Mahad News : दिवेआगर श्रीवर्धन या कोस्टल मार्गावर रात्री दरड कोसळली. यामुळे पाेलीसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. याबाबतची माहिती पाेलीसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या दाेन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. वेळी अवेळी येत असलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडत आहे. प्रशासनास देखील पावसामुळे काेठे छाेट्या माेठ्या दुर्घटना घडू नयेत याची काळजी घेत आहे. तसेच घडल्यास तातडीने उपाययाेजना करण्यासाठी ठाेस पावलं उचलत आहे.

आदगाव वेळास राेडवर पावसामुळे दरड काेसळली आहे. या घटनेची माहिती कळताच सागरी पाेलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पाेलीसांनी दिवे आगर श्रीवर्धन या कोस्टल मार्गावरील वाहतुक बंद केली. त्याबाबतची माहिती प्रसाद ढेबे ( पोलीस निरिक्षक दिघी सागरी पोलिस ठाणे) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

ते म्हणाले वेळास आणि आदगाव दरम्यान दरड (landslide at diveagar shrivardhan coastal road) काेसळली. काही दगड सुटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काेणतीही दुर्घटना घडू नये यासाठी या मार्गावरील वाहतुक बंदी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT