VIDEO : भाडं मागितलं म्हणून घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून फेकलं! SaamTv
मुंबई/पुणे

VIDEO : भाडं मागितलं म्हणून घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून फेकलं!

घरभाडे मागायला आलेल्या घरमालकाच्या मुलाला भाडेकरूने चक्क चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची घटना पुण्यातील पिंपळे गुरव परिसरात घडली आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : घरभाडे मागायला आलेल्या घरमालकाच्या मुलाला भाडेकरूने चक्क चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत सौरभ पोरे हा घरमालकाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सौरभ पोरे यांच्या मालकीच्या असलेल्या इमारतीत विजय पाटोळे हे आपल्या कुटुंबासह भाडयाने राहतात.

पाटोळे यांच्याकडे आठ महिन्याचे भाडे मागण्यासाठी घरमालक आणि त्यांचा मुलगा सौरभ पोरे गेला असता भाडेकरू असलेल्या पाटोळे कुटुंबियांना त्याचा राग आला व त्यांनी सौरभ पोरे याला इमारतीच्या टेरेस वर बोलावून धक्काबुक्की व शिवीगाळ करत टेरेस वरून खाली ढकलून दिले.

या घटनेत सौरभ पोरे गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी भाडेकरू विजय पाटोळे, त्याची पत्नी व मुलगा साहिल पाटोळे या कुटुंबावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price Hike : दिवाळीआधी इंधनाचा भडका! पेट्रोल-डिझेल महागणार? निवडणुकांआधी सर्वसामान्यांना बसणार शॉक

Homemade spice drink: नसांमध्ये जमा झालेली चरबीही झटक्यात वितळेल; फक्त या 3 गोष्टी पाण्यात उकळून प्या, हात-पायांचं दुखणंही थांबेल

Maharashtra News Live Update: सचिन वाझेने केलेलं कृत्य हे दहशतवादी कृत्यच, कारण त्यात स्फोटकांचा वापर झाला: एनआयएचा दावा

Dental Care: थंड किंवा गरम खाताना दातांत झिणझिण्या येतात? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

WhatsApp New Feature: WhatsApp चं भन्नाट फीचर! अकाउंट नसलेल्या व्यक्तींनाही करता येणार कॉल

SCROLL FOR NEXT