crime news in marathi Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: जमिनीवरून रक्तरंजित थरार! काका-पुतण्या भिडले; थेट झाडली गोळी, कानाला चाटून गेली

Pune Police Arrest Nephew for Shooting Uncle Over Land Dispute: जमिनीच्या वादातून पुतण्याने काकावर गोळीबार केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

काका पुतण्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. जमिनीच्या वादातून पुतण्याने आपल्या काकावर गोळीबार केला आहे. या घटनेत काका गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपास करत आरोपी पुतण्याला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील ढोकळवाडी वारक या गावात घडली आहे. काकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

सोपान चिंधू ढोकळे असे गंभीर जखमी झालेल्या काकांचे नाव आहे. तर, नवना नामदेव ढोकळे असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान ढोकळे यांच्या वडिलोपार्जीत जमिनीवर बांधण्यात आलेल्या शेडच्या फाउंडेशनवरून वाद झाला होता. वाद विकोपाला गेला. त्यानंतर पुतण्याने रागाच्याभरात बंदुकीतून काकावर गोळी झाडली.

गोळी कानामागून चाटून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. या घटनेनंतर त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. तसेच आरोपी पुतण्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुतण्या नवनाथवर पोलिसांनी काकांवर प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajeshwari Kharat: 'एक नंबर तुझी कंबर...' राजेश्वरीच्या साडीतील फोटोवरून नजर हटणार नाही

Plane Accident : अहमदाबादसारखी घटना, टेकऑफनंतर विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू

Satara News: सातारलं हादरलं! एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न|VIDEO

Chapri Meaning: एखाद्याला छपरी बोलण्याआधी शब्दाचा खरा अर्थ जाणून घ्या

Maharashtra Honey Trap Case : हनी ट्रॅपमध्ये अडकलेले ते ४ मंत्री , १५ आमदार कोण?

SCROLL FOR NEXT