lakhs of devotees for ekvira devi palkhi sohala karla gad Saam Digital
मुंबई/पुणे

Ekvira Devi : कार्ला गडावर 'आई राजा उदो उदो' चा गजर, लाखाे भाविकांच्या उपस्थित एकवीरा देवीचा पालखी साेहळा संपन्न

यात्रेकरिता कार्ला व वेहेरगावचा परिसर सजला होता. हारफुले, प्रसाद, कुंकू व खेळणी विक्रेते यांची दुकाने साहित्यांनी सजली होती. येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये याकरिता प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

दिलीप कांबळे

Lonavala :

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान कोळी, आग्री, आणि ठाकरे कुटुंबियाची कुलदैवत असलेल्या कार्ला गडावरील चैत्री यात्रेचा आई एकवीरा देवीचा मानाचा पालखी सोहळा एकवीरा गडावर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आई माउलीचा उदो उदो' ' आई आयलो' च्या नामघोषांनी तसेच गीतांच्या तालावर नृत्य करत अवघा कार्ला गड दुमदुमून गेला. (Maharashtra News)

कड़क पोलिस बंदोबस्तात पालखीचे मानकरी असलेल्या चौल,आग्राव व ठाणेकर यांनी पालखीला खांदा लावत 'आई राजा उदो उदो चा गजर केला. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गडावर तुफान गर्दी केली होती.

मुंबई व कोकण भागातून शेकडो पायी पालख्या गडावर आल्या होत्या. काही दिवस कित्येक तास पायी प्रवास करत भाविक कार्ल्यात दाखल झाले होते. यात्रेकरिता कार्ला व वेहेरगावचा परिसर सजला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हारफुले, प्रसाद, कुंकू व खेळणी विक्रेते यांची दुकाने साहित्यांनी सजली होती. येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये याकरिता तालुका प्रशासन व पोलिस विभाग यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवला होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nutrition Tips: जाणून घ्या,नवजात बाळाच्या विकासासाठी योग्य आहार

Exit Poll Maharashtra : कागलमध्ये समरजित घाटगे मारणार बाजी? पाहा Exit Poll

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

Irregular Periods: गरम पाण्यात तूप टाकून प्यायल्यास पिरीयड्सची समस्या होईल दूर; अनिरुद्धचार्यांच्या दाव्यावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT