Ladki Bahin Yojana Update Saam Tv
मुंबई/पुणे

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! 'ही' प्रोसेस ३१ डिसेंबर पर्यंत करा, अन्यथा खात्यात येणार नाही हप्ता

Ladki Bahin Yojana e-KYC Process Last Date : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींनी e-KYC मध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची अंतिम संधी आहे. वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास १५०० रुपयांचा लाभ थांबू शकतो.

Alisha Khedekar

  • e-KYC दुरुस्तीसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम संधी

  • एकदाच e-KYC सुधारण्याची मुभा

  • वेळेत प्रक्रिया न केल्यास १५०० रुपये थांबू शकतात

  • महिला सक्षमीकरणासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना ई केवयसी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही ही प्रोसेस केली नसेल तर तुमच्या खात्यात येणारे १५०० रुपये बंद होऊ शकतात.

लाडकी बहीण ( Ladaki Bahin Yojana e - kyc) योजनेचा १७ वा आणि १८ वा हप्ता खात्यात येण्यापूर्वी मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ई केवायसी बाबत मोठी अपडेट दिली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मंत्री अदिती तटकरे यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशी मागणी होत होती.

सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत असल्याने, या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील लाडक्या बहिणींना e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली आहे.

या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभागाचा मुख्य हेतू असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची ट्रकला धडक, कल्याणमधील दोघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: कल्याण डोंबिवलीत शिवसेना-भाजप मनोमिलन

Sydney Mass Shooting: हातात बंदुक, कंबरेला काडतुसांचा पट्टा; बॉन्डी बीचवर गोळीबार करणाऱ्या एका हल्लेखोराचा फोटो आला समोर

Monday Horoscope: जोडीदारासोबत संबंध सुधारतील, ४ राशींना कामामध्ये यश मिळण्याची शक्यता; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Lionel Messi: जगप्रसिद्ध फुटबॉलपूट लिओनेल मेस्सीची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT