Ladki Bahin Yojana  Saam tv
मुंबई/पुणे

Ladki Bahin Yojana : तब्बल 10 हजार लाडक्या अपात्र, अपात्रतेच्या यादीत तुमचंही नाव? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ladki Bahin Yojana update : लाडक्या बहिणींना आता वाढीव हफ्त्याची प्रतिक्षा असतानाच अनेक ठिकाणी अर्ज नामंजूर होत आहेत. पुणे जिल्ह्यात तब्बल 10 हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यामुळे राज्यभरात किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याचीच आता जोरदार चर्चा रंगू लागलीय. याला नेमकी काय कारणं आहेत? लाडकीचे निकष बदलले आहेत का? यावरचा हा विशेष रिपोर्ट..

Girish Nikam

पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. त्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. दर महिन्याला 1500 रुपये लाभार्थी महिलेला दिले जात आहेत. आता त्यामध्ये 2100 रुपये वाढ करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकीत दिलं होतं. सुमारे दोन कोटींच्या घरात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र आता अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींची नाराजी समोर येत आहे.

पुणे जिल्ह्यात या योजनेत आतापर्यंत 10 हजार बहिणी अपात्र ठरल्यायत. महिला आणि बालकल्याण विभागानं यासंदर्भात काय माहिती दिली आहे ते पाहूया..

10 हजार लाडक्या बहिणी अपात्र

- पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 10 हजार बहिणी अपात्र

- 15 ऑक्टोंबरपर्यंत 21 लाख 11 हजार 363 अर्ज मंजूर

- 20 लाख 84 हजार अर्जदारांना योजनेचा लाभ

- पुण्यात अजूनही 12 हजार अर्जांची छाननी बाकी - हवेली तालुक्यात सर्वाधिक 4 लाख 19 हजार 859 अर्ज

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे. अपुरे कागदपत्रं, मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न, एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांचा अर्ज असे काटेकोर निकष प्रशासनानं लावल्यानं लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातही अशा अटींमुळे सुमारे 42 हजार महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. राज्य सरकारची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे ही योजना राबवताना महायुतीची दमछाक होणार आहे. लाडक्या बहिणींना नाराज न करता योजनेची यशस्वी अंमलबजावणी कशी होणार ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT