Mumbai Women Protest  Saam Tv
मुंबई/पुणे

Ladaki Bahin Yojana: पैसे नको तर हक्काचं घर हवं, लाडक्या बहिणींचं मुख्यमंत्र्यांकडं साकडं

Mumbai Women Protest: आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको तर हक्काच घर पाहिजे असं साकडं या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. रक्षाबंधनानिमित्त मुंबईत लाडक्या बहिणींनी हे अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलं आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे देखील जमा झाले. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचा वातावरण आहे. पण मुंबईमध्ये लाडक्या बहिणींनी आंदोलन केलं आहे. आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको तर हक्काच घर पाहिजे असं साकडं या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. रक्षाबंधनानिमित्त मुंबईत लाडक्या बहिणींनी हे अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल येथील BIT चाळीमध्ये राहणाऱ्या महिलांनी आंदोलन केले आहे. राखी आणि आरतीच ताट हातात घेऊन लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांकडे साकडं घातलं आहे. रक्षा बंधनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणींनी हक्काच्या घराची मागणी केली आहे. बीडीडी चाळीसंदर्भात सरकारने जसे धोरण ठरवले तसे धोरण ठरवून BIT चाळीचा विकास करण्याची रहिवाश्यांनी मागणी केली आहे.

बीआयटी चाळीतील महिलांच्या आंदोलनाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य करावी असे मत या महिलांनी व्यक्त केले. घर बळकावणाऱ्या विकासकावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात सगळीकडे लाडकी बहीण योजनेचीच चर्चा पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये ३००० हजार रुपये जमा झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत आधी १ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. पण या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सरकारने मुदत दोन महिने ठेवण्याचे ठरवले. आता ३१ ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून १५०० रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT