Aditya Thackeray 
मुंबई/पुणे

Aditya Thackeray: राज्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर स्कीम सुरू; रस्त्यांच्या दुर्दशेवरुन आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मुंबईसह राज्यातील रस्त्यांच्या दुर्दशेवरुन राज्य सरकारवर टीका केलीय.

Bharat Jadhav

मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरुन आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. सध्या सरकारचे खोके, जनतेला धोके हे धोरण सुरू आहे. दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त करू, असा मुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचं काय झालं? असा सवाल करत राज्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर स्कीम सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.

मुंबई्च्या रस्त्यांची दुर्दशेवरुन बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या दीड दोन वर्षात महाराष्ट्राची लूट सुरू आहे. 15 जानेवारी 2023 रोजी पत्रकार परिषद घेतली होती, रस्ते घोटाळा समोर आला होता. मी दावा नाही तर पूर्ण माहिती घेऊन सांगतोय की कोणतंच काम झालं नसल्याचं, आदित्य ठाकरे म्हणाले. कंत्राटदार मित्रांना आवडलं नाही म्हणून कंत्राट रद्द करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील एक कंत्राटदार आहे , त्याने काम थांबवलं आहे. त्याने काम थांबवलं की थांबवायला सांगितलं याबाबत काहीच उत्तर आलेलं नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

परत एकदा ६ हजार कोटींची कंत्राट आणलं आहे. पुन्हा एकदा पाच कंत्राटदार मित्रांना हे दिलं जाणार आहे. मागे जे कंत्राट काढण्यात आलं त्यात किती काम झालं ते सांगा. किती जणांना ब्लॅक लिस्ट करण्यात आलं? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. रस्त्यांच्या कामांचे कंत्राट देण्यावरुनही आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केलीय. ब्लॉक लिस्ट झालेल्या कॉन्ट्रॅक्टरला काम कसं दिला जातय? नोव्हेंबरमध्ये आमचा सरकार आल्यावर आम्ही या कॉन्ट्रॅक्टरचा स्टॉप पेमेंट करणार आहोत हे काम थांबवणार आहोत.

त्यावेळी जो कोणी हा घोटाळा करताय त्याला आम्ही जेलमध्ये टाकू. मग तो मंत्री शिंदे गटाचा असेल त्याला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. रस्त्यावर सगळीकडे खड्डे पाहायला मिळतंय. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांच्या मित्राला कंत्राट द्यायचा म्हणून आपण हे सोसायच का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT