Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: देवतारी त्याला कोण मारी! चौदाव्या मजल्यावरून कोसळली मुलगी, मात्र केसालाही धक्का लागला नाही

Kurla News: देवतारी त्याला कोण मारी! चौदाव्या मजल्यावरून कोसळली मुलगी, मात्र केसालाही धक्का लागला नाही

साम टिव्ही ब्युरो

>> मयूर राणे

Mumbai News:

देव तारी त्याला कोण मारी ही म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. कुर्ल्यात एक १३ वर्षीय मुलगी थेट चौदाव्या मजल्यावरून खाली कोसळली. परंतु तिच्या हाताला किरकोळ दुखापत वगळता मोठी इजा झाली नाही. इतक्या उंचीवरून पडून तिचा जीव वाचला आहे, त्यामुळे याची मोठी चर्चा ही होत आहे.

सखीरा इस्माईल शेख असे या मुलीचे नाव असून ती तिच्या कुटुंबासह कुर्ला नेहरू नगर येथील मिडासभूमी हार्मोनी या सतरा मजली इमारतीमध्ये चौदाव्या मजल्यावरील घरात राहतात. वाढदिवसाला आलेल्या भेटवस्तू घेऊन सखीरा ही घराच्या खिडकीजवळ खेळत होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरातील इतर सदस्य हे टीव्ही पाहत होते. अचानक खेळताना खिडकीतून सखीराचा तोल गेला आणि ती चौदाव्या मजल्यावरून खाली कोसळली. मात्र कोसळत असताना झाडांच्या फांद्या आणि इमारती खालील शेडच्या पत्र्याला ती धडकत खाली कोसळली. (Latest Marathi News)

मुलगी इमारती खाली पडल्याचे कळताच संपूर्ण कुटुंबाच्या काळजात धस्स झाले. ते इमारतीच्या खाली पळाले. मात्र त्यांना तिथले दृश्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. सखीराला थोडीफार हाताला दुखापत झाली होती. मात्र ती एकदम सुरक्षित होती.

तिच्या कुटुंबाने तिला सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले असून आता ती एकदम सुरक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Maharashtra Politics: शिवसेनेत उलथापालथ! भास्कर जाधवांच्या निकटवर्तीयाची ठाकरे गटातून हकालपट्टी; कोकणात राजकीय भूकंप

Shocking : दुर्दैवी घटना! देवदर्शनाला गेलेल्या तरुणावर काळाचा घाला, समुद्रात बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचवलं

Diabetes Control: सकाळी करा 'या' पदार्थांच्या सेवनाने सुरुवात; डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय

पुण्यानंतर मुंबईत जमीन घोटाळा? 200 कोटींची जमीन फक्त 3 कोटींमध्ये खरेदी, थेट मंत्र्यांवरील आरोपांनी खळबळ

SCROLL FOR NEXT