Saam Tv
मुंबई/पुणे

Kurla Bus Accident: बेस्ट प्रशासनाकडून प्रकरण दाबलं जातंय का? पाहा VIDEO

BEST Administration: कुर्ल्यामध्ये सोमवारी रात्री बेस्ट बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४९ जण जखमी झाले.

Priya More

अपघातानंतर बेस्ट प्रशासनाची आरेरावी पाहायला मिळत आहे. बेस्ट प्रशासनाकडून प्रकरण दाबले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. वार्तांकन केले जात असताना माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की केली जात आहे. माध्यमांना रोखण्याचा प्रयत्न बेस्ट प्रशासनाकडून केले जात आहे.

कुर्ल्यामध्ये सोमवारी रात्री बेस्ट बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४९ जण जखमी झाले. जखमींवर सध्या भाभा आणि सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कंत्राटी कामगार आणि अनुभव नसलेल्या चालक संजय मोरेला ऑटोमॅटिक बस चालवण्यास दिली. त्याने पहिल्यांदाच ही बस सोमवारी चालवली आणि हा अपघात झाला.

अपघातग्रस्त बस चालक संजय मोरेविरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. संजय मोरेला अटक करण्यात आली. पोलिस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत. सध्या आरटीओकडून बस चालवून तपासाणी केली जात असून बस पूर्णपणे व्यवस्थित असल्याची माहिती समोर येत असली तरी आरटीओ अधिकारी काय माहिती देतात हे पाहण महत्वाचे ठरेल. इलेक्ट्रिक आँटो बसच्या एक्सिलेटरचा आवाज हा येत नसल्याने एक्सिलेटर कितीही दाबले तरी त्याची तीव्रता ही समजत नाही आणि यामुळे एक्सिलेटरचा चालकाला अंदाज आला नाही असं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चंद्रपूर भाजप आमदार बंटी बागडिया यांना धक्का

Skin Care Drink: महागड्या स्किन केअरपेक्षा आठवड्यातून ४ दिवस प्या 'हे' होममेड ड्रिंक; मिळेल सॉफ्ट आणि ग्लॉईंग स्किन

थांबायचं नाही! ठाकरे बंधूंना भाजपकडून जबरदस्त धक्का, बड्या नेत्यांनी धरली भाजपची वाट

५ महिला आणि २ बालके सहस्रकुंड धबधब्यात अडकले; पाहा थरारक VIDEO

Shocking : प्रेमाचा भयंकर शेवट! जंगलात सापडला तरुण-तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, हत्या की आत्महत्या?

SCROLL FOR NEXT