Kundmala Bridge Collapsed Saam Tv
मुंबई/पुणे

Kundmala Bridge Collapsed: कुंडमळा पूल कोसळतानाचा थरकाप उडवणारा फोटो समोर, दुर्घटनेत चौघांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

Maval Tragedy: पुण्यातल्या मावळमधील कुंडमळ्यामध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेच चौघांचा मृत्यू झाला होता. हा पूल कोसळतानाचा पहिला फोटो समोर आला आहे.

Priya More

पुण्यातल्या मावळमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली होती. कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला होता. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला होता. हा पूल नेमका कसा कोसळला याचा फोटो समोर आला आहे. पूल कोसळल्यानंतर अनेक जण इंद्रायणी नदीत वाहून गेले होते. यामधील ५१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही तीन ते चार जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. एनडीआरएफ टीमकडून बचावकार्य सुरू आहे.

कुंडमळा पूल दुर्घटनेचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की,पूलावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. पूल कोसळून नदीत पडला. पूर्णपणे पूल वाकला असून नदीमध्ये झुकला गेला. या पुलावर असणारे सर्व पर्यटक नदीमध्ये पडले. काही जण पुलाला धरून राहिले ते वाचले पण काही पर्यटक वाहून गेले. यामधील अनेक पर्यंटकांना पोहता येत नसल्यामुळे ते वाहून गेले तर ज्यांना पोहता येत होते ते कसे तरी बाहेर पडले. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला.

पुण्यातल्या मावळमध्ये कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली होती. रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी आले होते. कुंडमळा गावात जाण्यासाठी हा पूल होता. पूल ३० वर्षे जुना होता. पुलाला गंज लागला होता. या पूलावर एकाच वेळी जास्त पर्यटक आल्याने आणि पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने ओव्हरवेट होऊ पूल कोसळल्याची माहिती समोर आली होती. आता हा पूल कोसळतानाचा फोटो समोर आला. या फोटोवरून ही घटना कशी घडली हे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT