Koyta gang Vandalism of vehicles in Dhanori Kalwad area Pune city  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Koyta Gang: पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; मध्यरात्री १५ ते २० वाहनांची तोडफोड, नागरिक धास्तावले

Pune Crime News: पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या गुंडांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Koyta Gang Latest News

पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या गुंडांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हातात कोयते आणि रॉड घेऊन दहशत माजवत एका टोळक्याने शहरातील धानोरी, कलवड परिसरात सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास १५ ते २० वाहनांची तोडफोड केली आहे. तोडफोडीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Police) तपासाची चक्रे फिरवत दोन अल्पवयीन मुलांसह एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या गुंडाविरोधात कारवाईची मोहिम हाती घेतली होती.

पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली होती. ज्या भागात कोयता गँगचे (Koyta Gang) गुंड दहशत माजवत होते. त्याच भागातून पोलीस या गुंडांची वाजत गाजत मिरवणूक काढत होते. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे कोयता गँगच्या गुंडांना चांगलीच धडकी भरली होती. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक केले जात होते.

पोलिसांच्या कारवाईनंतर काही दिवस कोयता गँगचे गुंड लपून बसले होते. कुठलाही दहशत माजवली, तर आपल्याला अटक होईल, असा धसका कोयता गँगच्या गुंडांनी घेतला होता. दरम्यान, पोलिसांचं दुर्लक्ष होताच कोयता गँग पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही गुंडांनी हातात कोयते तसेच रॉड घेऊन खेसे पार्क, डायमंड हॉल, तिरंगा नगर, बडी मस्जिद गल्ली अशा जवळपास अर्धा किलोमीटरच्या परिसरातील १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. यामध्ये रिक्षा आणि चार चाकी वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. तोडफोडीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तातडीने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT