Landslide on Konkan Railway Track Saam TV
मुंबई/पुणे

Konkan Railway: कोकण रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका; दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द, प्रवाशांचे मोठे हाल

Satish Daud

अमोल कलये, साम टीव्ही

मागील ४८ तासांपासून मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळून माती आल्याने कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या (Konkan Railway) रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. रेल्वेसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, खेड जवळील दिवाणखवटी (Ratnagiri Landslide) या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेला ब्रेक लागला आहे. सध्या वाहतूक पूर्णत: ठप्प असून प्रवाशांचे मेगाहाल होत आहेत. अनेक स्थानकांवर प्रवासी अडकून पडले आहेत. रविवारी रात्रभर रेल्वे मार्गावरील दरड हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू होते.

कोकणातील कोणकोणत्या रेल्वेगाड्या रद्द?

  • ट्रेन क्रमांक १२१३३ मुंबई सीएसएमटी - मंगळुरू जंक्शनचा 14/07/2024 रोजी सुरू होणारा एक्सप्रेस प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

  • गाडी क्रमांक 20111 मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन "कोकण कन्या" एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

  • ट्रेन क्रमांक 50104 रत्नागिरी दिवा पॅसेंजर प्रवास 15/07/2024 रोजी सुरू होणारा पूर्ण रद्द करण्यात आला आहे.

  • गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी मडगाव जं. "15/07/2024 रोजी सुरू होणारी जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

  • गाडी क्र. 22150 पुणे जं. एर्नाकुलम जं. 14/07/2024 रोजी सुरु होणारा एक्सप्रेस प्रवास कल्याण - लोणावळा दौंड जंक्शन मार्गे वळवला आहे.

  • 14/07/2024 रोजी सुरू होणारे कल्याण - लोणावळा - दौंड जंक्शन मार्गे वळवले आहे. - वाडी - गुंटकल - रेनिगुंटा जोलारपेट्टाई - पलक्कड - शोरनूर.

  • गाडी क्र. 09057 उधना - मंगळुरू जंक्शन 14/07/2024 रोजी सुरू होणारा विशेष प्रवास कल्याण लोणावळा दौंड जंक्शन मार्गे वळवला आहे.

  • ट्रेन क्र. 12432 H. निजामुद्दीन तिरुवनंतपुरम मध्य राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास 14/07/2024 रोजी सुरू होणारा पनवेल लोणावळा - दौंड जंक्शन मार्गे वळवण्यात आला आहे.

  • ट्रेन क्र. 12618 एच. निजामुद्दीन - एर्नाकुलम जं. 14/07/2024 रोजी सुरु होणारा एक्सप्रेस प्रवास भुसावळ जंक्शन मार्गे वळवण्यात आला आहे.

  • 14/07/2024 रोजी सुरू होणारी ट्रेन क्रमांक 50103 दिवा रत्नागिरी प्रवासी प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

  • गाडी क्र. 12742 पटना वास्को द गामा एक्सप्रेसचा प्रवास 13/07/2024 रोजी जिते येथे सुरू झाला आणि कल्याण लोणावळा पुणे मिरज लोंडा-मडगाव मार्गे वळवला जाईल.

  • गाडी क्र. १२६१९ लोकमान्य टिळक (टी) मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेसचा प्रवास १४/०७/२०२४ रोजी रोहा येथे सुरू होत असून ती कल्याण- लोणावळा- पुणे- मिरज- लोंडा- मडगाव- ठोकूर मार्गे वळवली जाईल.

  • ट्रेन क्र. 16335 गांधीधाम- नगरकोइल जं. 12/07/2024 रोजी विन्हेरे येथे सुरू होणारा एक्सप्रेस प्रवास कल्याण लोणावळा पुणे मिरज - लोंडा मडगाव - ठोकूर - मंगळुरू जंक्शन मार्गे वळवला जाईल.

  • गाडी क्र. 12284 H. निजामुद्दीन - एर्नाकुलम एक्स्प्रेसचा प्रवास 13/07/2024 रोजी माणगाव येथे सुरू होतो आणि कल्याण लोणावळा पुणे मिरज - लोंडा मडगाव-ठोकूर - मंगळुरु जंक्शन मार्गे वळवला जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT