Anganewadi Bharadi Devi Kokan Railway Special Train News Saam Tv
मुंबई/पुणे

Kokan Railway News : आंगणेवाडीच्या जत्रेला जाताय? मुंबईतून विशेष ट्रेन धावणार, वेळापत्रक काय? तिकीट बुकिंग कधी करता येणार?

Anganewadi Bharadi Devi Kokan Railway Special Train News : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रेसाठी कोकण रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. लाखो भाविकांच्या सोयीसाठी मुंबई-मडगाव विशेष रेल्वे धावणार आहेत.

Alisha Khedekar

  • आंगणेवाडी येथील भराडी देवी जत्रा ९ फेब्रुवारी रोजी

  • दहा लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज

  • कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा

  • मुंबई–मडगाव मार्गावर भाविकांचा प्रवास होणार सुलभ

Anganewadi Bharadi Devi 2026 Kokan Railway Special Train News लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा येत्या ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या यात्रेला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थिती दर्शवतात. यंदा सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेला उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणरेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रेल्वेने जत्रेसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या आहेत.

वर्षातून एकदा येणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेसाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असतो. या जत्रेसाठी भाविक अनेक दिवस वाट पाहत असतात. देवीचं वस्त्रालंकारांनी सजवलेलं रूप याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी भाविक आतुर आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीयांसह आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असतात. या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईहून कोकणवासीय गावी जातात. त्यांच्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

विशेष रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : -

  • कोकण रेल्वेवर ट्रेन क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष ट्रेन ०८ फेब्रुवारी २०२६ आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०७ वाजून ५५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री १० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

  • ट्रेन क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडी ०७ फेब्रुवारी २०२६ आणि ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ०४ वाजून ३० वाजता मडगाव जंक्शनवरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

  • ही ट्रेन करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबतील.

  • या ट्रेनला एकूण २२ कोच असतील. यामध्ये २० स्लीपर कोच आणि २ एसएलआर कोच असणार आहेत.

  • या ट्रेनचे थांबे आणि वेळापत्रकाची सविस्तर माहिती www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला पाहता येणार आहे. तर, ट्रेन क्रमांक ०१००४ साठीचे तिकीट बुकिंग ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपादरम्यान आष्टी तालुका कृषी कार्यालयात गोंधळ

El Niño : मान्सून का रेंगाळला? 'एल निनो'चा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? पुण्यात पाऊस कधी कोसळणार? पाहा IMD चा अंदाज

Shocking : धक्कादायक! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या; अतिरक्तस्राव झाला अन् भयंकर घडलं

Thyroid Health Tips: थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले हे ७ घरगुती उपाय नक्की करा

India vs Afghanistan ODI: रोहितचा रेकॉर्ड, विराटच्या जागी कोणाला संधी? वाचा अफगाणिस्ताविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT