Pune Crime News SaamTv
मुंबई/पुणे

Pune : सूनच निघाली पुण्यातील जबरी चोरीची मास्टरमाइंड; चाैघे अटकेत

हा प्रकार २ फेब्रुवारीला घडला होता.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन जाधव

Pune Crime News : घरात (house) घुसून तोंडावर टॉवेल गुंडाळून हातातील सोन्याच्या (gold) बांगड्या व सुनेच्या गळ्यातील गंठण जबरदस्तीने चोरून नेल्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी संशयितांना अटक (arrest) केली आहे.

हा प्रकार २ फेब्रुवारी रोजी मिठानगर येथे घडला होता. या गुन्ह्याचा तपास करताना फिर्यादी यांची सुनच गुन्ह्याची मुख्य सुत्रधार निघाली. पोलिसांनी सुनेसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

कासीम बुरानसाब नाईकवाडी (वय-21 रा. जेवरगी झोपडपट्टी, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक), मेहबुबसाब अब्दुलसाब बदरजे (वय-25 रा. निलकोड ता. जेवरगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक), अब्दूल दस्तगीर मुल्ला (वय-19 रा. गाव येड्रामी आंबेडकर चौक ता. येड्रामी, जि. गुलबर्गा, कर्नाटक) आणि 30 वर्षीय सुनेला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी संशयित आरोपी सुनेच्या सासूने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yawatmal : कापूस पिकं उद्ध्वस्त, शेतकऱ्याला अश्रू अनावर |VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

TVS Ev Smartwatch: स्कूटरची चार्जिंग संपली, टायर पंक्चर झालाय? तुम्हाला झटक्यात कळलेल; TVS ईव्ही स्मार्टवॉच लाँच, किंमत किती?

Airport Jobs 2025: फ्रेशर्ससाठी खुशखबर! एअरपोर्टवर भरती सुरु; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारिख

Karnala Fort History: पक्षी अभयारण्यामध्ये वसलेला ऐतिहासिक कर्नाळा किल्ला, जाणून घ्या खास इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT