Koḷi community leaders submitting a petition to Kalyan-Dombivli Municipal Corporation demanding action against Bangladeshi fish sellers. Saam Tv
मुंबई/पुणे

कल्याण डोंबिवलीत कोळी समाजाचा रोष; बांगलादेशी मच्छी विक्रेत्यांवर तात्काळ कारवाईची मागणी

Koli Community Protest Against Bangladeshi Fish Sellers: कल्याण डोंबिवलीत कोळी समाज बांगलादेशी व परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत आहे. स्थानिक मच्छी विक्रेत्यांचा व्यवसाय व नागरिकांचे आरोग्य यासाठी चिंता व्यक्त केली.

Omkar Sonawane

कल्याण डोंबिवलीत कोळी समाजाने बांगलादेशी व परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली.

निवेदनाद्वारे स्थानिक मच्छी विक्रेत्यांचा व्यवसाय व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याची मागणी.

कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर यांनी बाहेरील विक्रेत्यांवर बंदी घालण्याचा इशारा दिला.

महानगरपालिका प्रशासनाने निवेदनाची दखल घेत तपासणी करणार असल्याचे आश्वासन दिले.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत बांगलादेशी व परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांमुळे स्थानिक भूमिपुत्र मच्छी विक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा येत असल्याचा आरोप करत कोळी समाज आक्रमक झाला आहे. या संदर्भात कोळी समाजाच्या शिष्टमंडळाने केडीएमसी महापौरांना निवेदन देत संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

कोळी समाजाचे म्हणणे आहे की, बाहेरील काही मच्छी विक्रेते कमी दरात व खराब प्रतीची मासळी विक्री करीत असून त्यामुळे स्थानिक मच्छी विक्रेत्यांचा व्यवसाय घटत आहे. तसेच निकृष्ट दर्जाची मासळी विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महानगरपालिका व अन्न व औषध प्रशासन विभागाने बाजारपेठांमध्ये नियमित तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

याबाबत कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर यांनी इशारा देताना सांगितले की, बांगलादेशी व परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांवर तात्काळ बंदी घालून स्थानिकांना संरक्षण द्यावे. अन्यथा कोळी समाज तीव्र आंदोलन छेडेल. दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाने निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाकडून तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलीसाठी राजकीय दबाव टाकल्याने महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्याचे निलंबन

Pub Fire: मध्यरात्री पबमध्ये अग्नितांडव, भीषण आगीमध्ये होरपळून २७ जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Blood Sugar : रोज कॉफी सेवन केल्याने शुगरवर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Rain Alert: पुन्हा पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT