Kolhapur Mumbai Flights Saam TV
मुंबई/पुणे

Kolhapur Mumbai Flights : कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी! कोल्हापूर- मुंबई विमान सेवेमध्ये मोठा बदल

Flight schedule : येत्या ५ एप्रिलपासून विमानाने प्रवास करत काही तासांतच मुंबईहून कोल्हापूर गाठता येणार आहे.

Ruchika Jadhav

Kolhapur Mumbai : कोल्हापूर- मुंबई असा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. कारण येत्या ५ एप्रिलपासून विमानसेवेत काही बदल करण्यात येणार आहेत. आठवड्यातील चार दिवस ही विमानसेवा पुरवली जाणार असून यामध्ये मंगळवार, बुधवार, गुरूवार आणि शनिवारी ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे. (Flight schedule)

स्टार एअरवेज या कंपनीने ही सेवा सुरू केली तेव्हा आठवड्यातून फक्त दोन दिवस दिले जात होते. मात्र आता आठवड्यातून ४ दिवस ही सेवा पुरवली जाणार आहे. मुंबईत असलेल्या अनेक पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी आल्यावर लगेचच परतीचा प्रवास करता येत नव्हता. मात्र विमानसेवेत झालेल्या या बदलांमुळे ते शक्य झाले आहे. आता एका दिवसात मुंबई दर्शन झाल्यावर तुम्ही कोल्हापूरला जाऊ शकता.

विमानाची वेळ काय आहे?

मुंबई ते कोल्हापूर

स्टार एअरवेजचे विमान सकाळी १०:३० वाजता मुंबईहून उडाण घेईल. त्यानंतर १ तासात विमान कोल्हापूरला पोहचेल. तसेच पुन्हा तासाभराने विमान मुंबईला येणार आहे.

कोल्हापूर - मुंबई

तर कोल्हापूरहून मुंबईसाठी सकाळी 11.55 वाजता विमानाचे टेक ऑफ होणार आहे अन् मुंबईत 12 वाजून 55 मिनिटांनी लँडिंग होणार आहे.

कोल्हापूरात नागरिकांना या सेवेचा फायदा होण्यासाठी कोल्हापूर विमानतळाच्या (Airport) धावपट्टीचे विस्तारीकरण करण्याचे काम सुरू आहे. तसेच येथे प्रवाशांसाठी टॅक्सी पार्किंग, नाईट लँडिंग अशा सुविधा देखील दिल्या जात आहेत. सध्या कोल्हापूर विमानतळावरून दिल्ली, हैदराबाद, बंगळूर, तिरुपती या ठिकाणी विमानसेवा पुरवल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT