लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पिझ्झा हा खूप आवडतो. पिझ्झा खात असाल तर सावध व्हा कारण पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगर मध्ये ही घटना घडली आहे.
पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे.प्रसिद्ध पिझ्झा ब्रँडच्या पिझ्झामध्ये हा चाकूचा तुकडा आढळला आहे. काल रात्री हा सर्व प्रकार घडला आहे. (Knief Piece Found In Pizza)
इंद्रायणी नगर मध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांसाठी काल रात्री पिझ्झा ऑर्डर केला होता. त्यांनी 596 रुपये किमतीचा एक पिझ्झा ऑनलाइन ऑर्डर केला होता. पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना, अरुण कापसे यांच्या दातात अक्षरशः पिझ्झा कट करणाऱ्या चाकूच्या तुटलेला तुकडा घुसला होता.
अरुण कापसे यांनी आपल्या सोबत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याने त्यांनी लगेच पिझ्झाच्या दुकानाच्या मॅनेजरला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र, सुरुवातीला त्यांना पिझ्झाच्या मॅनेजर कडून उडवा उडवीची उत्तर देण्यात आली. मात्र मॅनेजरने घरी येऊन पिझ्झातील तुटलेला चाकूचा तुकडा बघितल्यानंतर त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या सर्व प्रकारानंतर पिझ्झा कंपनीकडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डर चे पैसे लगेच परत करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी, खेळ खेळणाऱ्या पिझ्झा कंपनीविरोधात अरुण कापसे हे आज पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.