Sanjay Raut | Kirit Somaiya
Sanjay Raut | Kirit Somaiya Saam TV
मुंबई/पुणे

संजय राऊतांवर आठ दिवसात गुन्हा दाखल करा नाहीतर...; सोमय्यांचा इशारा

जयश्री मोरे

मुंबई: भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी नवघर पोलीस ठाण्यात जाऊन नवघर पोलीस ठाण्यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. जर आठ दिवसात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले आहेत.

आता संजय पांडे (Sanjay Pande) यांची कसोटी आहे की ते जनतेचे पोलीस कमिश्नर आहेत की उद्धव ठाकरेंचे. संजय राऊत यांना कधी कोर्टानं थप्पड मारली तर कधी सेशन कोर्टाने. लोकांच्या लक्षात आलं आहे की संजय राऊत हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा भोंगा आहेत अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्या आणि पत्नी मेधा सोमय्या हे अब्रुनुकसानीची तक्रार दाखल करण्यासाठी मुलुंड पोलीस स्थानकात गेले होते. संजय राऊतांना किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विक्रांत घोटाळा असेल किंवा टॉयलेट घोटाळा असेल यात सोमय्यांनी घोटाळा केला आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत. आगामी काळातही अनेक घोटाळे बाहेर येतील असे राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात मागच्या अनेक दिवसांपासून वाकयुद्ध सुरु आहे. सोमय्यांनी राऊतांवर गंभीर आरोप केल्यानंतर राऊतांनीही पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांवरती घोटाळ्याचे आरोप केले. दरम्यानच्या काळात सोमय्यांवरती पुण्यात आणि मुंबईमध्ये हल्ला झाला. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या आणि भाजपने केला होता.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Viral Video: मन जिंकलस भावा! दिनेश कार्तिकडून ऑरेंज कॅप स्वीकारताच विराटने केलं असं काही- Video

Mother's Day: कामानिमित्त घरापासून लांब आहात? मग 'मदर्स डे'ला अशा पद्धतीने आईला खुश करा

Travelling Tips: विमानातून प्रवास करताना परफ्यूम आणि डिओड्रंट न्यायला बंदी, पण का?

Shreyas Talpade On COVID Vaccine : कोरोना व्हॅक्सिनमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका?, अभिनेता म्हणाला, 'लस घेतल्यानंतरच मला...'

PBKS vs CSK: आज चेन्नई-पंजाब भिडणार! कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् मॅच प्रेडिक्शन

SCROLL FOR NEXT