किरीट सोमय्या  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: किरीट सोमय्यांचा सत्कार भोवणार; भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल

पुणे महापालिकेत भाजप नेते किरीट सोमय्या यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: पुणे महापालिकेत भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, त्याच ठिकाणी भाजपच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. (Kirit Somaiya felicitation Filed a case against BJP leaders)

हे देखील पहा-

पुणे (Pune) महापालिकेत किरीट सोमय्या यांचा भाजपने (BJP) केलेल्या सत्कार प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी (police) गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदी आदेश उल्लंघन, घोषणाबाजी आणि बेकायदेशीर जमाव जमवून त्या ठिकाणी गोंधळ झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेत शिवसैनिकांनी (Shiv Sainik) किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता. त्याचठिकाणी त्यानंतर भाजपकडून किरीट यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. त्यामुळे आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, बापू मानकर, राजेश येनपुरे, दीपक पोटे, धनंजय जाधव, दत्ता खाडे, गणेश घोष, प्रतीक देसरडा यांच्यासह 350 ते 400 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम १४३, १४५, १४७,१४९, ४२७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(३) आणि १३५ अंतर्गत या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT