Rahul Bajaj Passes Away: पद्मभूषण राहुल बजाज यांचे पुण्यात निधन; शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार

हमारा बजाज हे कंपनीचे ब्रीदवाक्य निश्चित करून आपल्या कार्यकर्तत्वाने ते प्रत्यक्षात उतरवून दाखविलेले द्रष्टे उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (वय- ८३) यांचे अल्पशा आजाराने काल पुण्यामध्ये खासगी रुग्णालयात दुपारी निधन झाले
Rahul Bajaj
Rahul Bajajsaamtv
Published On

पुणे: हमारा बजाज हे कंपनीचे ब्रीदवाक्य निश्चित करून आपल्या कार्यकर्तत्वाने ते प्रत्यक्षात उतरवून दाखविलेले द्रष्टे उद्योगपती (Industrialist) पद्मभूषण राहुल बजाज (वय- ८३) (Rahul Bajaj) यांचे अल्पशा आजाराने काल पुण्यामध्ये (Pune) खासगी रुग्णालयात (hospital) दुपारी निधन झाले आहे. मागील महिनाभरापासून कर्करोगाशी सुरू असणारा लढा अपयशी ठरला आहे. बजाज यांच्या निधनाने उद्योगजगतावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. (Rahul Bajaj Passes Away Funeral today Government)

हे देखील पहा-

राहुल बजाज यांचे पार्थिव रविवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास आकुर्डी (Akurdi) येथील कंपनीत (company) अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. यानंतर दुपारी ४:३० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत (Cemetery) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या वाहनविषयक गरज ओळखून स्कूटरपासून ते भन्नाट स्पोर्टस् बाईक बनवून सर्वसामान्यांच्या जीवनाला बजाज यांनी गती प्राप्त करून दिली आहे. वर्षभराचे वेटींग असायचे तरीही लोक पैसे भरुन ‘बजाज बुक’ करत असे अभिमानाने सांगत असायचे.

Rahul Bajaj
Ukraine: 'युक्रेनवर हल्ला केल्यास मोठी किंमत चुकवावी लागणार'; जो बायडन यांचा रशियाला इशारा

बजाज ही केवळ कंपनी नव्हती तर सर्वसामान्याकरिता ‘हमारा बजाज’ बनल्याचे ते द्योतक होते. या किमयेचे राहुल बजाज हेच जादुगार होते. त्यांच्या कारकिर्दीतील ‘एम फिप्टी’ आणि ‘एम एटी’ या २ बाईकनी तर विक्रीचा विक्रम नोंदविला होता. आकुर्डी येथे बजाज यांचे निवासस्थान आहे. कंपनीच्या आवारातच बजाज परिवार वास्तव्यास आहे. बजाज महिनाभरापासून पुण्यामधील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. त्यांना कर्करोगाबरोबर न्यूमोनिया आणि हृदयविकाराचाही त्रास होत होता. त्यांची प्रकृती खालावत गेली होती आणि शनिवारी दुपारी २:३० सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com