Pune News Saam tv
मुंबई/पुणे

किरीट सोमय्या हल्ला प्रकरण: शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह शिवसैनिक पोलीस ठाण्यात हजर

या प्रकरणात मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सनील गाडेकर

पुणे - भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आज सकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.या प्रकरणात मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत लाटे यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात सोमवारी सनी गवते (वय ३२, रा. नाना पेठ) याला अटक करण्यात आली आहे. धक्काबुक्की झाल्याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे देखील तक्रार केली आहे.

गुन्हा दाखल झालेल्या अन्य शिवसैनिकांचा पोलीस शोध घेत होते. त्यामुळे शहर प्रमुखांसह अनेक शिवसैनिक स्वतःहून पोलिसांत हजर झाले आहेत. या सर्वांवर काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

गुन्हा दाखल झालेल्या अन्य शिवसैनिकांचा पोलीस शोध घेत होते. त्यामुळे शहर प्रमुखांसह अनेक शिवसैनिक स्वतःहून पोलिसांत हजर झाले आहेत. या सर्वांवर काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT