किरण गोसावी लखनऊमधून पसार; पुणे पोलिसांना देत आहे चकवा
किरण गोसावी लखनऊमधून पसार; पुणे पोलिसांना देत आहे चकवा Saam Tv
मुंबई/पुणे

किरण गोसावी लखनऊमधून पसार; पुणे पोलिसांना देत आहे चकवा

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

फरार किरण गोसावी पोलिसांसमोर हजर होणार म्हणून पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊला रवाना झाले आहे. तिथे गेल्यानंतर किरण गोसावीने पुणे पोलिसांना गुंगारा दिला आहे. गोसावीचं आत्ताच लोकेशन फत्तेपुर सिक्री मध्ये असून गोसावी पोलिसांना चकवा देत असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांचं पथक किरण गोसावीला आणण्यासाठी सकाळी लखनऊला रवाना झाले आहे. किरण गोसावी विरोधात लुक आऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. आर्यन खान प्रकरणातील मुख्य सुत्रधार म्हणून किरण गोसावीकडे पाहिले जाते. जेव्हापासून मनीष भानुशाली, किरण गोसावी यांची नावं समोर आली तेव्हापासून गोसावी फरार आहे. आर्यन खान प्रकरणात जे पंच नेमण्यात आले होते त्यापैकी एक किरण गोसावी आहे.

काल गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने खळबळजनक आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटीं मागीतले असल्याचा आरोप प्रभाकरने किरण गोसावी आणि सॅम नावाच्या व्यक्तीवर केला आहे. त्याचबरोबर त्यातले ८ कोटी हे समीर गायकवाड यांना देखील दिले जाणार होते अशी माहिती प्रभाकर साईल आपल्या खुलाश्यात केली होती. काल सर्व माध्यमांवर बोलताना किरण गोसावीने आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले होते आणि पोलिसांनी शरण जाणार असल्याचंही सांगितले होते, परंतु आता पुन्हा गोसावी पोलिसांना चकवा देत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडेंवर धक्कादायक आरोप केले होते. त्यांनी काही पुराव्यानिशी समीर वानखेडे आणि त्यांची कारवाई कशी खोटी आहे हे दाखवले. परंतु समीर वानखेडेंनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आहे. त्यानंतर अनेक आरोप मलिक करत आहेत. काल समीर वानखेडेंनी विशेष NDPS कोर्टात जाऊन साक्ष दिली आणि आपण चौकशीला तयार असल्याचे सांगितले होते. वानखेडे आज सकाळी दिल्लीला दाखल झाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

Narendra Modi Exclusive : अभिजित पवार यांनी PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; देशभरासह महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

SCROLL FOR NEXT