निरोप बाप्पाला : लालबागच्या राजाच्या विसर्जनाची जय्यत तयारी Saam Tv
मुंबई/पुणे

निरोप बाप्पाला : लालबागच्या राजाच्या विसर्जनाची जय्यत तयारी

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मागील १० दिवसांपासून भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गणेश विसर्जनाकरिता गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. घरगुती गणेश विसर्जनासाठी ५ तर मंडळाच्या गणपतीसाठी १० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाकरिता प्रशासनाने तयारी केली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा राजाच्या विसर्जनासाठी फुल्लांचा रथ सजवण्यात आला आहे. १० वा. राजाची शेवटची आरती केल्यानंतर राजाची विसर्जन मिरवणुक दरवर्षीच्या मार्गक्रमनिकेनुसार गिरगाव चौपाटीला जाणार आहे.

या वेळी मात्र, कोरोना नियमांचे पालन करत लाडक्या राजाला निरोप दिला जाणार आहे. यासाठी पोलिसांनीही गर्दी होऊ नये. या अनुषंगाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक जण रस्त्यांवर गर्दी करताना दिसून येण्याची शक्यता आहे. अशातच लालबाग परिसरामध्ये मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. काही वेळातच लालबागचा राजा विसर्जनसाठी मंडपाच्या बाहेर निघणार आहे. यावेळेस गर्दी होऊ नये, आणि कायदा सुव्यवस्था पालन करण्यात यावे यासाठी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात ठेवण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT