धक्कादायक| पत्नीशी झालेल्या वादाच्या रागातून बापानेच केली स्वत:च्या मुलाची हत्या! विकास मिरगणे
मुंबई/पुणे

धक्कादायक| पत्नीशी झालेल्या वादाच्या रागातून बापानेच केली स्वत:च्या मुलाची हत्या!

परंतु तो सतत मुलाला उचलून खाली आपटतच राहिला...

विकास मिरगणे

सानपाडा : दुसऱ्या पत्नीशी झालेल्या वादातून सानपाडा रेल्वे स्टेशन (Sanpada railway station) वरील फलाट क्र. 3 वर स्वतःच्या 4 वर्षीय मुलाचे तीन वेळेस डोके आपटून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे संपुर्ण दुर्दैवी घटना सीसीटीव्ही CCTV मध्ये कैद झाली आहे. हत्या करणाऱ्या बापाला वाशी जीआरपी GRP यांनी अटक केली आहे. सकलसिंग पवार अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Killing his own son)

सानपाडा रेल्वे स्टेशनवर फलाट क्र. 3 व 4 दरम्यान हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. हे कुटुंब मूळच्या यवतमाळ येथील भटक्या कुटुंबातील असून सानपाडा पुलाखाली राहते होते भीक मागून गुजराण करत होता. आरोपी सकलसिंह पवार आणि पत्नीचे नेहमी वाद होता त्यादिवशी भांडण करत असताना रेल्वे स्थानकावर पोहचले यावेळी फलाटावर सर्व जण एकत्र चालत असताना, सकलसिंग पवार याचा पत्नीसोबत वाद सुरू असतानाच त्याने स्वतःच्या 4 वर्षांच्या मुलाला उचलून रेल्वेच्या फलाटावर (Railway platform) आपटले. यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या इकर लोकांनी त्याला अडविण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो सतत मुलाला उचलून खाली आपटतच राहिला. एका महिलेने धाडसाने त्याला अडवून मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न देखील अपयशी ठरला आणि अखेर त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी सकलसिंग पवारच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मयत प्रशांत हा सकलसिंगच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. त्याची मृत प्रशांतची आई सध्या गावी आहे तर आरोपी हा त्याच्या तो दुसऱ्या पत्नीसोबत नवी मुंबईत सानपाडाला राहत आहे. तिचे मेहर असे नावं आहे.

रविवारी रात्रीपासून सकलसिंग याचा दुसरी पत्नी मेहेरसोबत वाद सुरू होता. सोमवारी सकाळी सगळे सानपाडा स्थानकात आले असताना त्याच ठिकाणी या नवरा बोयकोचा वाद सुरू झाला आणि याच रागातून सकलसिंगने मुलगा प्रशांत याला उचलून आपटून त्याची निर्दयी हत्या केली आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याचे माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mehandi Designs: नवरीच्या पायावर मेहंदी का काढतात?

Sugar Cookies Recipe: ख्रिसमससाठी खास, घरच्या घरी बनवा शुगर कुकीज, वाचा सोपी रेसिपी

Gautami Patil : मोकळे केस, काळा गॉगल; अक्षय खन्नाच्या गाण्यावर गौतमी पाटीलनं लगावले ठुमके, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

ISRO ने इतिहास रचला! वजनदार सॅटेलाइट केला लाँच, मोबाइल नेटवर्कमध्ये बदल होणार

SCROLL FOR NEXT