Crime
Crime Saam TV
मुंबई/पुणे

२५ लाखांच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करून हत्या; दोघांना अटक

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई विरार - मीरा रोड येथे २५ लाखांच्या खंडणीसाठी १४ वर्षीय मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याचे धक्कादायक प्रकार मिरा रोड (Mira Road) येथे उघडकीस आला आहे. काशिमिरा पोलिसांनी (Police) याप्रकरणी २ आरोपींना अटक केली आहे.

मिरा रोड येथील शांतीपार्क परिसरात हिना नहार सिंग ही महिला दोन मुलांस राहते. ती बोरिवलीच्या एका बार मध्ये गायिका म्हणून काम करते. रविवारी रात्री ती नेहमप्रमाणे कामावर गेली होती. रात्री १२ च्या सुमारास तिचा १ मुलगा हा घरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील पाहा -

त्यानंतर मंगळवारी दुपारी या मुलाचा मृतदेह वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. या मुलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मयत मुलाचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलाची आई बारबाला असल्याने तिच्याकडे भरपूर पैसे असतील असे त्यांना वाटले. पैशांच्या आमिषाने त्यांनी मुलाचे अपहरण करून खंडणीचा बनाव रचला होता.

दरम्यान, त्या मुलाला संशय आल्याने आरोपींनी त्याची हत्या केली आणि नंतर त्याच्याच फोनने खंडणी मागितली, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी काशिमिरा पोलीस सखोल तपास करीत असून त्यांनी नेमकी हत्या का केली. खंडणी साठी की अन्य काही कारण होते याचा तपास पोलीस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strong Bones : हाडांच्या मजबूतीसाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा; सांधे दुखी होईल छुमंतर

Shantigiri Maharaj Nashik News | नाशिकमधून गावितांनी घेतली माघार, शांतिगिरी अजूनही ठाम

ED Raid: मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजून ईडी अधिकारीही थकले

Today's Marathi News Live : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रशासन मतदानासाठी सज्ज

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

SCROLL FOR NEXT