Kharghar Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Kharghar Accident News: बागेत खेळायला गेली अन् सिमेंटचा बाक कोसळला; ४ वर्षीय चिमुकलीने वडिलांसमोरच सोडले प्राण

Kharghar Park Accident News: बागेत खेळायला गेली अन् मोठा अनर्थ घडला; सिमेंटचा बाक कोसळून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Ruchika Jadhav

Kharghar News:

खारघर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बागेत खेळताखेळता एका ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. बागेतील एक सिमेंटचा बाक कोसळला. या अपघातात चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. सदर घटनेमुळे चिमुकलीच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खारघरमधील ही बाग सिडकोकडून बांधण्यात आली आहे. सदर बाग सेक्टर १२ मध्ये येत असून देखभालीसाठी पनवेल महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आलीये. गेल्या काही महिन्यांपासून या बागेची पालिकेकडून देखभाल करण्यात आलेली नाही.

बागेत अनेक ठिकाणी सिमेंटच्या बाकांना तडे गेलेत. लहान मुलांसाठी असेले झोपाळे देखील तुटलेत. त्यामुळे नागरिकांनी उद्यानाच्या दयनीय अवस्थेसाठी अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केली होती. तक्रार करुनही उद्यानामध्ये दुरुस्ती करण्यात आली नाही. सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश विश्वकर्मा यांची मुलगी या बागेत खेळत होती.

बाबा काम करत असताना ती सिमेंटच्या बाकाजवळ गेली. हा बाक तुटला होता. त्यावर बसण्याचा प्रयत्न करताना बाक चिमुकलीच्या अंगावर पडला. सिमेंटचा बाक तिच्यावर कोसळला. सिमेंटचा बाक अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी या घटनेसाठी अधिकाऱ्यांवर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bor Fruits Benefits: थंडीत बोरं खाण्याचे फायदे काय?

१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओतील तरूण रस्त्यावर? लोकांनी त्याला काठ्यांनी मारलं; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Sanchar Saathi App: संचार साथी अ‍ॅप अनिवार्य नाही, प्री इन्स्टॉलचा केंद्र सरकारचा निर्णय मागे

Health Care : हिवाळ्यात रक्त वाढवण्यासाठी खावेत हे पदार्थ

SCROLL FOR NEXT