Arrest Saam Tv
मुंबई/पुणे

तडीपार सराईत गुन्हेगारांना खडकपाडा पोलिसांकडून अटक

दोन कोयते एक नकली बंदूक जप्त

प्रदीप भणगे

कल्याण - कल्याणच्या (Kalyan) खडकपाडा पोलीस (Police) ठाण्याचे पोलीस कर्मचारी कल्याण जवळील शहाड परिसरात गस्त घालत असताना एक संशयीत रिक्षा त्यांना जाताना दिसली, त्या रिक्षात चार जण होते. पोलिसांनी हाक मारुन त्या रिक्षाला थांबविण्याचा प्रयत्न केला.तेवढ्यात रिक्षा चालकाने रिक्षा थांबविली आणि रिक्षामधून उड्या टाकून दोन जण पळून गेले. तर बाकी दोन जणांना दोन पोलिसांनी पकडले.

हे देखील पहा -

दरम्यान रिक्षाची तपासणी केली असता रिक्षात दोन कोयते आणि एक बंदूक सापडली. मात्र काही क्षणात ही बंदूक नसून सिगरेट जाळण्याचा लायटर असल्याचे कळले हे तपासात समजले. या बंदुकीचा वापर लोकांना घाबरविण्यासाठी केला जात असल्याने पोलिसांनी मोहम्मदगौस शेख आणि मुसब शेख या दोघांना अटक केली. तपासात आरोपी मुसब हा बाजारपेठ पोलीस ठाण्यातून तडीपार आहे, हे समजले.

दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर नक्की हे दोघे काय करण्यासाठी चालले होते. त्याचे पळून गेलेले साथीदार कोण आहेत. हे सर्व लूटपाट किंवा घातपात करणार होते का? बंदूकी सारखा दिसणारा लायटरचा वापर कशासाठी केला जात होता? याचा तपास आत्ता सुरु आहे अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT