pune police ends life saam tv
मुंबई/पुणे

Pune News : धक्कादायक! ऑन ड्यूटी पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, पुण्यातील घटना

pune police ends life : पुण्यात ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, पुणे

Pune khadak Police Ends Life :

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात शुक्रवारी पहाटे पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने लोहिया नगर येथील पोलीस चौकीत पोलिसाने जीवनयात्रा संपवली आहे.

भारत दत्ता अस्मर असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आज शुक्रवारी पहाटे पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. पोलीस कर्मचारी भारत अस्मर याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. कर्मचारी भारतच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर पोलीस कर्मचारी भारत अस्मर यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

तत्पूर्वी, आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. कौटुंबिक वादातून हा सर्व प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत हे गुरुवारी रात्रपाळी असल्याने कामावर हजर होते. भारत हे शुक्रवारी पहाटे लोहिया नगर पोलीस चौकीत आराम करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या बंदुकीतून त्यांनी स्वत:वर चार गोळ्या झाडून घेतल्या. भारत यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT