Reconstruction at Lohagad Fort reveals how the accused allegedly planned and executed Ketan Agarwal’s murder. Saam Tv
मुंबई/पुणे

केतनच्या हत्येसाठी सियानं केला बनाव, हत्येआधी सिया आणि चेतनची लोहग़डावर रेकी

Ketan Agarwal Case Lohagad Siaya Goyal Chetan Chaudhary Plot: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि तिचा साथीदार चेतन चौधरीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत आरोपींकडून दररोज नवनवे खुलासे करण्यात येत आहेत. अशातच आता केतनच्या हत्येआधी सिया आणि चेतननं लोहग़डावर रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. पाहा यावरचा हा रिपोर्ट....

Suprim Maskar

18 जूनला लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचा दरीत कोसळून मृत्यू झाला... मात्र सुरुवातीला अपघात वाटत असलेलं हे प्रकरण नंतर हत्यकांड असल्याचं उघ़ड झालंय. या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला पोलिसांनी अटक केली...मात्र हत्येपूर्वी सिया आणि चेतननं आधीच लोहगडावर जाऊन सराव केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय...याच सरावात सिया आणि चेतननं हत्येसाठी सीक्रेट कोड तयार केला होता...

हत्येच्या एक दिवस आधी सिया आणि चेतननं पुण्याच्या लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये बसून केतनच्या हत्येचा कट रचला...दोघांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन हत्येसाठी योग्य जागेची निवड केली....आणि तिथेच हत्येच्या कटाची रंगीततालीम केली...18 जूनला लोहगडावर पोहोचल्यावर सियाने पाणी पिण्याच्या किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने खाली बसून मागे चालणाऱ्या चेतन चौधरीला इशारा द्यायचे असे ठरले... केतन दरीत कोसळत असताना त्याने स्वतःला वाचवण्यासाठी सियाला पकडू नये, म्हणूनच ती खाली बसली होती. सियाचा इशारा मिळताच चेतननं केतनला थेट 400 फूट खोल दरीत ढकलून दिलं...

दरम्यान हत्येनंतर सियानं स्थानिकांची मदत घेण्याऐवजी थेट आधी आपल्या आईला फोन केला आणि 'केतन किल्ल्यावरून खाली पडला' अशी माहिती दिली. जवळपास पुढील 15 मिनट सिया आपल्या नातेवाईकांशी बोलत राहिली...ज्यामुळे केतनचा जीव वाचू शकला नाही...मात्र हत्येआधीही सियानं असाच सिक्रेट कॉल आपल्या प्रियकराला केला होता...

केतनच्या हत्येआधीचा 'तो' सिक्रेट कॉल

केतनला दरीत ढकलण्याच्या 34 मिनिटांआधी सियाचा चेतनला सिक्रेट कॉल...कॉल डिटेल्स रेकॉर्डनुसार (CDR), हा फोन कॉल म्हणजे केतनच्या हत्येच्या अंतिम कटाचा 'गो-अहेड' म्हणजेच अंतिम होकार होता, असा पोलिसांना संशय आहे. हत्येआधी लोकेशन आणि आजुबाजुला पर्यटक नसल्याची सियानं कॉलवर खात्री केली...गुन्हा लपवण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवरील डेटा नष्ट केला...ज्य़ामुळे पोलिसांची सायबर विंग फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीनं चॅट्स शोधणार आहेत...

पुणे पोलिसांनी आरोपी सिया गोयलला लोहगडावर नेऊन संपूर्ण गुन्ह्याचं रिक्रिएशन केलयं...त्यामुळे पोलिसांनी केतन अग्रवाल प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढवलाय... आता याप्रकरणात आणखी कोणते नवे खुलासे समोर येतात... आणि पोलिसांच्या हाती आणखी काय काय पुरावे लागतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शाहांकडून शिंदेंना फडणवीसांची सुपारी, फडणवीसांच्या खुर्चीसाठी ठाकरेंचं साईबाबांना साकडं, पंतप्रधानपदासाठी फडणवीसांना ठाकरेंचा पाठिंबा?

जालन्यात FDA ची मोठी कारवाई, मन:प्रभावी औषधांचा बेकायदेशीर साठा जप्त

नवऱ्याचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी वडाच्या झाडाला महिलेनं बांधल्या दारूच्या बाटल्या

नसरापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा, अवघ्या 60 दिवसांत खटला निकाली

Maharashtra News Live Update: शिवसैनिकांडून चोरट्याविरोधात "ऑपरेशन तुडवा "...

SCROLL FOR NEXT