KDMC Saam Tv News
मुंबई/पुणे

KDMC News: मांडा-टिटवाळ्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाईचा धडाका; KDMCतील बडा अधिकारी निलंबित

KDMC illegal construction action: मांडा-टिटवाळा प्रभागातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई न केल्यामुळे सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात आलं आहे. अतिरिक्त आयुक्तांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

Bhagyashree Kamble

कल्याण-डोंबिवली महापालिकेने बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. मांडा-टिटवाळा प्रभागातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई न केल्यामुळं सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना निलंबित करण्यात आलंय. केडीएमसीचे अतिरिक्त त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, त्यानंतरही केडीएमसीच्या अ प्रभाग क्षेत्र अंतर्गत असलेल्या टिटवाळा मांडा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचं दिसून येत होते. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही अनधिकृत बांधकामाबाबात ठोस पावलं उचलली गेली नाहीत.

याच कारणामुळे केडीएमसी प्रशासनाकडून तत्कालीन संबंधित सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्यानं ही कठोर पावलं उचलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी संदीप रोकडे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या ६५ बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी प्रशासन तत्कालीन संबंधित अधिकऱ्यांवर कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT