KDMC contractors protest over ₹200 crore pending payments saam tv
मुंबई/पुणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KDMC Contractors Protest Over ₹200 Crore Pending Payments: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर ठेकेदार संघटनेचे आंदोलन. तीन वर्षांपासून सुमारे २०० कोटी रुपयांची देणी थकीत असल्याचा आरोप करत ठेकेदारांनी तातडीने बिले अदा करण्याची मागणी केली.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर आज ठेकेदार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेची विविध विकासकामे पूर्ण करूनही ठेकेदारांना त्यांच्या कामाची देणी मिळालेली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महापालिकेची कामे पूर्ण केल्यानंतरही बिले अदा न झाल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ठेकेदारांकडे काम करणारे कामगार तसेच साहित्य पुरवठा करणारे सप्लायर पैशांसाठी सतत तगादा लावत आहेत. त्यामुळे ठेकेदारांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असून, अनेकांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

आम्ही सरकारची आणि महापालिकेची कामे केली आहेत. आमच्या मेहनतीचे पैसे सरकारने आम्हाला द्यावेत,” अशी मागणी ठेकेदारांनी केली. गेल्या तीन वर्षांपासून देणी रखडल्याने ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने आणि महापालिका प्रशासनाने तातडीने थकीत बिले अदा करावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. ठेकेदार संघटनेच्या म्हणण्यानुसार, सुमारे १०० ते १५० ठेकेदारांची तब्बल २०० कोटी रुपयांची देणी सरकारकडे/महापालिकेकडे थकीत आहेत. या थकीत रकमेमुळे ठेकेदारांना कामगारांचे वेतन, साहित्य पुरवठादारांची देणी तसेच इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण झाले आहे.

यावेळी आंदोलकांनी असा गंभीर आरोपही केला की, आर्थिक देणी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे काही ठेकेदारांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून ठेकेदारांची थकीत देणी तातडीने द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, थकीत बिलांबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ठेकेदार संघटनेने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

पीएम किसान योजनेतून ४,००० नावे वगळली जाणार; शासनाकडून कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन, काय आहे कारण?

Kuttu Flour Puri Recipe : उपवासाची कुट्टूची पुरी बनवताना तुटते? पिठात मिसळा 'हा' पदार्थ, पुरी होईल कुरकुरीत अन् टम्म फुललेली

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT