Ravindra Dhangekar SAAM TV
मुंबई/पुणे

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांनी निकालाआधीच उधळला विजयाचा गुलाल; कार्यकर्त्यांमध्ये भलताच उत्साह

Ravindra Dhangekar : अधिकृत निकाल जाहीर होण्याआधीच रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे.

Nandkumar Joshi

Kasba Peth Bypoll Election Result : विधानसभेच्या कसबा पेठ पोटनिवडणुकीची आज, गुरुवारी मतमोजणी सुरू असून, सुरुवातीचे कल येत आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या कसबा पेठमधून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. तर भाजपचे हेमंत रासने हे पिछाडीवर आहेत. अद्याप अधिकृत निकाल जाहीर झाले नसले तरी, विजयाचा आत्मविश्वास असलेल्या धंगेकरांच्या समर्थकांनी आधीच विजयी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत विजयी होणारच, असा विश्वास भाजपने व्यक्त केला होता. भाजपने कसबा पेठमधून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती.

रवींद्र धंगेकर अखेर विजयी

रवींद्र धंगेकर यांनी अधिकृत निकाल जाहीर होण्याआधीच विजयाचा गुलाल उधळला होता. मात्र, काही वेळाने निकाल जाहीर झाला. रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा ११०४० मतांच्या फरकाने पराभव केला.

हेमंत रासने यांनीही पराभव स्वीकारला आहे. उमेदवार म्हणून मी कमी पडलो. यामागची कारणे शोधणार आहे. पक्षाने मला संधी दिली पण मी कमी पडलो. माझा पराभव मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया रासने यांनी यावेळी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयकडून संशयित विद्यार्थ्यांची चौकशी

Skipping Benefits: वजन कमी करायचंय? मग रोज सकाळी दोरी उड्या मारा, होईल हा बदल

Belapur : हिरव्यागार डोंगरमाथ्यावर वसलाय भव्य किल्ला, पनवेल गाडी पकडा अन् बेलापूरला उतरा

Pregnancy Planning Tips: लवकरच मिळेल गूड न्यूज! बाळासाठी प्रयत्न करताना महिलांनी 'या' १० टिप्स ठेवाव्यात लक्षात

ITR Filing Mistakes: आयटीआर फाइल करताना 'या' चुका कधीच करु नका, अन्यथा भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT