Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar  Saam tv
मुंबई/पुणे

Ravindra Dhangekar : भाजपला घाम फोडणारे रवींद्र धंगेकर आहेत तरी कोण? राज ठाकरेंशी आहे कनेक्शन

साम टिव्ही ब्युरो

Ravindra Dhangekar News : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. मात्र भाजपला घाम फोडणारे रवींद्र धंगेकर आहेत तरी कोण ? जाणून घेऊया. (Latest Marathi News)

भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदार संघ भाजपच्या हातून निसटला आहे. 28 वर्षांनी भाजपचा मोठा पराभव झाला आहे. रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. भाजपला घाम फोडणारे रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात.

रवींद्र धंगेकर हे कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. भाजपचे हेमंत रासने यांच्या विरोधात लढून धंगेकरांनी घवघवीत यश मिळवलं.त्यामुळे पोटनिवडणुकीत धंगेकरांकडून भाजपला पराभवाचा दे धक्का मिळाला. 28 वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारली.

मात्र, धंगेकर हे काँग्रेसमध्ये येण्याआधी शिवसेनेत कार्यरत होते. त्यानंतर ते मनसेत गेले. मनसेतून ते काँग्रेसमध्ये दाखल झालेत आणि काँग्रेसकडून त्यांना कसबा पेठ पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली.

राज ठाकरेंचे होते अत्यंत विश्वासू

रवींद्र धंगेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू होते. मनसेत त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केले. मनसेत त्यांचे राजकीय वजन वाढले. चारवेळा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.पालिकेच्या माध्यमातून त्यांनी कसबा पेठ मतदारसंघात अनेक कामे केली.

रवींद्र धंगेकर यांनी मनसेकडून 2009 ची विधानसभा निवडणूक लढली होती.यावेळी त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांना मोठं आव्हान दिलेलं. त्यावेळी त्यांचा थोडक्यात पराभव झाला.

बापट यांनी नवख्या धंगेकरांवर केवळ 7 हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर बापट यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख झाली. 2014 मध्येही कसबा पेठेतून धंगेकर यांनी निवडणूक लढवली. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. 2017 मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना काँग्रेसकडून 2019 मध्ये तिकीट मिळाले नाही. यावेळी अरविंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Election: 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर ?

19 स्पीकर्स, 8 एअरबॅग्ज आणि माईल्ड माइल्ड हायब्रिड इंजिन; Audi Q7 Bold Editio भारतात लॉन्च

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

Amit Shah: पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप 310 जागा जिंकलीय, अमित शहांचा मोठा दावा

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना

SCROLL FOR NEXT