Kasba-Chinchwad Bypoll Election Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Bypoll Election : चिंचवडमध्ये ६ वाजेपर्यंत ५०.४७% मतदान, तर कसब्यात 5 वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ६ वाजेपर्यंत एकूण ५०.४७% मतदान

मतदानाची अंतिम आकडेवारी एकूण मतदान:- ५,६८,९५४

झालेले मतदान:- २,८७,१४५

मतदान केंद्र:- ५१०

सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी- ५०.४७%

चिंचवड मतदार संघातील दोन बूथवर अजूनही मतदान सुरू

चिंचवड मतदार संघातील दोन बूथ वर अजूनही मतदान प्रक्रिया सुरू आहे. या बूथवर एवढ्या उशिरापर्यंत मतदान का सुरू आहे याबाबत थोड्याच वेळात माहिती देण्यात येईल असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

कसबा आणि चिंचवडमधील संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी

चिंचवडमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 41.06 टक्के मतदान, तर कसब्यात 5 वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान

रुपाली ठोंबरे पाटील यांची हेमंत रासने यांच्याविरोधात तक्रार

रुपाली ठोंबरे पाटील यांची हेमंत रासने यांच्याविरोधात तक्रार, पक्ष चिन्हाचा वापर केल्याबद्दल तक्रार, पक्ष चिन्ह असलेला मफलर घालून रासने यांनी केलं मतदान

भाजप उमेदवार हेमंत रासने अडचणीत? आचारसंहितेच्या शिस्तीचा केला भंग

कसबा मतदारसंघातील भाजपा उमेदवार हेमंत रासने अडचणीत येण्याची शक्यता आहे . हेमंत रासनेंकडून आचारसंहिता शिस्तीचा भंग केला आहे. थेट मतदान केंद्रात पक्षचिन्ह असलेला रुमाल वापरला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कारवाई करणार का,हे पहावे लागणार आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत चाललंय काय? मतदान केंद्रात मतदाराकडून व्हिडिओ चित्रण

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. चिंचवड पोटनिवडणूकित चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मतदान केंद्रात मोबाईल वापरास परवानगी नसताना व्हिडीओ चित्रण होतेच कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी तपासणी का करत नाहीत? असे प्रश्न नेत्यांकडून केले जात आहे.

चिंचवडमध्ये सुद्धा गोपनीय मतदान प्रक्रियेचा भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदाराकडून ईव्हीएम मशीनवर असलेल्या चिन्हा समोरील बटण दाबून मतदान केल्याचा व्हिडिओ सामच्या हाती आला आहे. निवडणूक विभाग काय कारवाई याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शैलेश टिळक, कुणाल टिळक यांच्यासह घरातील सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

शैलेश टिळक, कुणाल टिळक यासह घरातील इतर जणांनी आज कसबा पोटनिवडणुकी चा हक्क बजावला. दरवर्षी मतदान करत होतो, या वर्षी ही केले आहे पण दरवर्षी मुक्ता बरोबर यायचो निवडणुकीला आज ती उणीव भासत आहे अशी भावना व्यक्त करताना शैलेश टिळक भावूक. मला खात्री आहे की भाजप कसबा पोटनिवडणूक नक्की जिंकेल, शैलेश टिळक यांनी दर्शवला विश्वास

चिंचवड विधानसभा मतदारसंघात ८ इव्हिएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी हाती आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीच्या मतदानात ८ इव्हिएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. इव्हिएम मशीन बिघडलेल्या ठिकाणी काही काळ मतदान थांबवावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टीमने इव्हिएम मशीन बदलल्या

गंजपेठेत भाजपाच्या माजी नगरसेवकाचा मतदारावर हल्ला

कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. अशातच भाजपाच्या माजी नगरसेवकाने हल्ला केल्याचा आरोप एका मतदाराने केला आहे. गंजपेठेमध्ये हा प्रकार घडला असून, अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

'सत्ताधाऱ्यांना परभवाची भीती असली की...'; संजय राऊत यांचा घणाघात

पुण्यातील पोटनिवडणुकीच्या मतदानावर भाष्य खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. 'पुण्यात मतदानाची टक्केवारी आता जरी कमी असली तरी नंतर वाढणार आहे. आज रविवार असून पुणेकर उतरले की रांगा लागणार. पुणेकरांचा प्रचारात मोठा प्रतिसाद होता. 5 ते 6 मंत्री प्रत्येक मतदारसंघात आहेत. सरकारी यंत्रणांचा वापर केला जातोय. परभवाची भीती असली की दबावतंत्र वापर केला जातो' , असे संजय राऊत म्हणाले.

रूपाली ठोंबरे पाटील यांनी केला गोपनीयतेचा भंग; निवडणूक आयोग कारवाई करणार का?

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढून गोपनीयतेचा भंग केला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रात ६ टक्के इतके मतदान

कसबा विधानसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रात ६ टक्के इतके मतदान पार पडले आहे. सकाळी ९.३४ पर्यंत कसबा मध्ये ६.५ टक्के मतदान पार पडले.

चिंचवड मतदारसंघांत पहिल्या दोन तासात ३.५२ टक्के मतदान

चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान सुरु आहे. या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत अर्थात मतदानाच्या पहिल्या दोन तासात ३.५२ टक्के मतदान झाले.

मतदान केंद्रावर सागर आंघोळकर आणि राहुल कलाटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर भाजपाचे माजी नगरसेवक सागर आंघोळकर आणि विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे कार्यकर्त्यांमध्ये झाली धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे फक्त तणावपूर्ण परिस्थिती आटोक्यात आली आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या मुलांचं पहिलंच मतदान आईसाठी

आज बाबांची खुप आठवण येत आहे. मात्र, वडिलांचे निधन झाल्यानंतर आईचं कुटुंबासाठी वडील असते आणि तेच मी माझ्या आई मध्ये बघितलं आहे. मतदार देखील तसाच विश्वास ठेवून आम्हाला विजय करतील असा विश्वास लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगताप यांनी व्यक्त केलाय. ऐश्वर्या मागील पंधरा दिवसांपासून तिच्या आईसोबत म्हणजे महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रचार करताना दिसल्या होत्या आज वडिलांची आठवणीने त्या भावुक झाल्याचही बघायला मिळालं

कसब्यात मतांसाठी पैसे वाटप? मारहाण झाल्याचा आरोप करत नागरिक उतरले रस्त्यावर

पुण्यात काल रात्री मीठगंज पोलीस चौकी समोर नागरिक रात्री रस्त्यावर उतरले. उमेदवारांकडून पैसे दिले जात आहेत. दबाव आणला जात आहे मारहाण केली जात आहे. महिला युवक मोठ्या संख्येने रात्री रस्त्यावरती उतरून त्यांनी आंदोलन केलं. कसबा पेठ पोट निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप झाल्याचा आरोप काल दंगेकर यांनी केला होता. रात्रीही मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर लोया नगर गंज पेठ भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरले पोलिसांकडं कारवाईची मागणी केली.

माझा निश्चितच विजय होईल; अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया

चिंचवड विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदानाचा हक्क बवाजला आहे. अश्विनी जगताप यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. चिंचवड विधानसभा क्षेत्रातील जनता दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेम करत असल्याने या मतदारसंघात माझा निश्चितच विजय होईल असा विश्वास अश्विनी जगताप आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच भाऊ शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

हेमंत रासनेंनी घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन

मतदान करण्यापूर्वी कसबा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी दगडूशेठ मंदीरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी या निवडणुकीत विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

रवींद्र धंगेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. रवींद्र धंगेकर यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन सकाळी पहिल्या टप्प्यातच मतदान केलं.

नाना काटे यांनी बजावला मतदानाचा हक्क

चिंचवडचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नाना काटे यांनी पी. के. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर येथे मतदानाचा हक्क बजावला.

रवींद्र धंगेकर यांनी सपत्नीक घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

रवींद्र धंगेकर यांनी सपत्नीक दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतल. बाप्पाचा आशीर्वाद देताना त्यांनी पैसे वाटपावरून झालेल्या राजकारणाचा उल्लेख करताना देवाच्या दरबारात न्याय होईल असं म्हणत विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्यांच्याशी बातचीत केली आहे प्राची कुलकर्णीने.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन्ही जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी आज (२६फेब्रुवारी) मतदान होत आहे. रविवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत दोन्ही मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत एकूण १६ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीची रंगत अधिकच वाढल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT