Kasba Peth-Chinchwad Assembly By Election saam tv
मुंबई/पुणे

Kasba-Chinchwad By Election: मिशन कसबा-चिंचवड पोटनिवडणूक! मतदार आणि निवडणूक यंत्रणा सज्ज

Kasba-Chinchwad By Election: कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी 26 फेब्रुवारीला मतदान होत आहे.

Prachee kulkarni

Kasba Peth-Chinchwad Assembly By Election: कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी रविवारी २६फेब्रुवारीला मतदान होत आहे.

रविवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत दोन्ही मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी आवश्‍यक मतदान यंत्रासह सर्व कर्मचारी शनिवारी दुपारीच मतदान केंद्रांकडे रवाना झाले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते आणि उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले. (Latest Marathi News)

कसबा पोटनिवडणुकीत एकूण १६ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एका मतदान यंत्रावर जास्तीत जास्त सोळा उमेदवारांची नावे देण्याची तरतूद आहे. तसेच नकारात्मक मतदानाचा ‘नोटा’ हा पर्याय उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रत्येक बुथवर दोन मतदानयंत्रे वापरली जाणार आहेत. (Latest Political News)

या दोन्ही पोटनिवडणुकीच्या मतदान कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेशी खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

मतदारसंघनिहाय मतदार व कार्यरत यंत्रणा

कसबा विधानसभा मतदारसंघ

- एकूण मतदार --- २ लाख ७५ हजार ६७९

- एकूणमध्ये पुरुष मतदार --- १ लाख ३६ हजार ९८४

- एकूणमध्ये महिला मतदार --- १ लाख ३८ हजार ६९०

- तृतीयपंथी मतदार --- ०५

- एकूण मतदान केंद्र --- २७०

- मतदानासाठी नियुक्त कर्मचारी --- १ हजार २५०

- मतदानासाठी राखीव पथके --- २७

- पोलिस बंदोबस्त --- ८३ पोलिस अधिकारी व ६०० पोलिस तैनात

चिंचवड विधानसभा मतदारसंघ

- एकूण मतदार --- ५ लाख ६८ हजार ९५४

- एकूणमध्ये पुरुष मतदार --- ३ लाख २ हजार ९४६

- एकूणमध्ये महिला मतदार --- २ लाख ६५ हजार ९४७

- दिव्यांग मतदारांची संख्या --- ६ हजार ६७०

- तृतीयपंथी मतदार --- ३४

- एकूण मतदान केंद्र --- ५१०

- मतदानासाठी नियुक्त कर्मचारी --- तीन हजार

- मतदानासाठी राखीव पथके --- ५१

- पोलिस बंदोबस्त --- ७२५ अधिकारी व ३ हजार ७०७ पोलिस तैनात

मतदानासाठी बारापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा अनिवार्य

- मतदार ओळखपत्र

- आधारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बॅंक किंवा टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक

- श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

- वाहन चालक परवाना, पॅनकार्ड

- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे स्मार्टकार्ड

- भारतीय पारपत्र (पासपोर्ट)

- छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तावेज

- राज्य, केंद्र सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्रासह ओळखपत्र

- खासदार, आमदारांना दिलेले त्यांचे अधिकृत ओळखपत्र

- केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे दिव्यांगत्वाचे ओळखपत्र

परदेशातील मतदारांसाठी मूळ भारतीय पासपोर्ट अनिवार्य

कसबा किंवा चिंचवड या दोन्हीपैकी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील मतदार हे परदेशात राहत असतील तर, अशा परदेशातील मतदारांना त्यांची ओळख पटवून देण्यासाठी त्यांना त्यांचा मूळ भारतीय पासपोर्ट सादर करावा लागेल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT