Ravindra Dhangekar Kasba Peth Election Saam Tv
मुंबई/पुणे

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांनी कसब्याचा गड कसा जिंकला?, ५ मुद्द्यांमधून मिळतील सगळ्या प्रश्नांची उत्तरे!

कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे भाजपसाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची होती.

Satish Daud

Kasba Peth Election Ravindra Dhangekar : कसबा विधानसभा पोटनिवडणूकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. यामध्ये महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजार मतांनी पराभव केला. कसब्यात भाजपला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, त्यांच्या २८ वर्षांच्या जुन्या गडाला सुरूंग लावण्यास महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झाले आहेत. (Latest Marathi News)

कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे भाजपसाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची होती. तर महाविकास आघाडीला राज्यातल्या सत्ताबदलानंतर आपली ताकद दाखवून देण्याची संधी होती त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली. भाजपनं सर्व ताकद लावूनही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडून आले.

रवींद्र धंगेकरांच्या विजयाचं पहिलं कारण

कसबा पोटनिवडणूकीत महाविकासआघाडीचा उमेदवार निवडणूक येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी उमेदवार म्हणून केलेली रवींद्र धंगेकरांची निवड. रवींद्र धंगेकरांशिवाय महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार असता तर ही निवडणूक जिंकणे जवळपास अशक्य होते. काँग्रेसने हा विजय मिळवला याचे मोठे श्रेय रवींद्र धंगेकरांना स्वत:ला आहे. (Maharashtra Political News)

कसब्यात धंगेकरांचा दांडगा जनसंपर्क

अत्यंत तगडा जनसंपर्क असलेला उमेदवार ही धंगेकरांची सर्वात जमेची बाजू होती. नगरसेवक म्हणून काम करत असताना कायम लोकांसाठी उपलब्ध असणे, नेहमी जनतेत मिळून मिसळून राहणे यामुळे धंगेकरांबद्दल आपुलकी असणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. याचा फायदा निवडणूकीत धंगेकरांना झाला. मतदारवर्ग त्यांच्या बाजूने उभा राहिला. धंगेकरांच्या तुलनेनं हेमंत रासने जनसंपर्काच्या मुद्यावरून धंगेकरांपुढे तोकडे पडले. त्यांचा तितका जनसंपर्क नव्हता.

काँग्रेसमध्ये आलेलं चैतन्य, कार्यकर्त्यांचा एकजुटीने प्रचार

कसबा निवडणुकीत धंगेकरांच्या विजयाचं तिसरं कारण ठरलं ते काँग्रेसमध्ये आलेलं चैतन्य आणि कार्यकर्त्यांची मिळालेली साथ. धंगेकरांना उमेदवारी दिल्यानंतर कसब्यात जे वातावरण निर्माण झाले त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची मरगळ झटकली गेली आणि ते अत्यंत जोमाने प्रचारात उतरले. काँग्रेसमधील गटतटही बाजूला पडले. सोबतच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी करो या मरो अशी भूमिका घेत पूर्ण ताकद पणाला लावली.

कसब्यात महाविकास आघाडीने दाखवलेली एकी

कसबा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखवलेली एकी ही धंगेकरांच्या विजयाचं चौथं कारण सांगितलं जातंय. महाविकास आघाडीतील ही जागा काँग्रेसला गेल्यानंतरही राष्ट्रवादी आणि ठाकरे गटांच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी एकी दाखवली. त्यांनी अगदी दिलखुलासपणे धंगेकरांचा प्रचार केला. त्यामुळे तिन्ही पक्षांची ताकद दिसून आली.

धंगेकरांचं साधं राहणीमान, कार्यकर्त्यांविषयी आपुलकी

रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचं पाचवं कारण म्हणजे, त्यांचं साध राहणीमान आणि कार्यकर्त्यांविषयी असलेली आपुलकी. धंगेकर हे नेहमी अनेकांना अ‍ॅक्टिवावर प्रवास करताना दिसतात, त्यांचे घर ते महापालिका कार्यालय हा रोजचा प्रवास ही अ‍ॅक्टिवावरुन असतो. आजपर्यंत त्यांना कधीही कुणी कारमध्ये फिरताना बघितलेलं नाही. अगदी स्कुटीवरून फिरत ते अनेकांच्या भेटीगाठी घेतात मतदारांशी संपर्क ठेवतात. त्यांच्या विजयात या गोष्टीचा देखील महत्वाचा वाटा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

Naga Chaitanya Birthday : नागा चैतन्य 'या' अभिनेत्रीला किस करताना घाबरला, स्वतः सांगितला होता किस्सा

Assembly Result : काही तरी मोठी गडबड आहे, महाराष्ट्राच्या सध्याच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्याला शंका

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

SCROLL FOR NEXT