Karuna Sharma  Saam Tv
मुंबई/पुणे

करुणा शर्माच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

करुणा शर्मा (karuna sharma) हिच्यासह अजयकुमार देडेवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैसर्गिक अत्याचार, कौटुंबीक छळ अशा वेगवेगळ्यावर कलमानुसार करुणा शर्मा आणि अजय देडेवर गुन्हा नोंद झाला आहे

साम टिव्ही ब्युरो

पुणे : करुणा शर्मा (karuna sharma) हिच्यासह अजयकुमार देडेवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैसर्गिक अत्याचार, कौटुंबीक छळ अशा विविध कलमान्वये करुणा शर्मा आणि अजय देडेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील (Pune) येरवडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसात गुन्हा (Crime) दाखल झाल्याने करुणा शर्माच्या अडचणी वाढल्या आहेत. ( Pune Crime News In Marathi )

करुणा शर्माच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेला तिच्या पतीकडून घटस्फोट दे म्हणून धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ वर्षीय पीडित महिलेने करुणा शर्मा आणि तिच्या पतीने धमकावत शस्त्राचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पोलिसात (Police) करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे या दोघांवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोण आहेत करुणा शर्मा ?

करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात सर्वांत पहिल्यांदा जानेवारी २०२१ मध्ये चर्चेत आलं. करुणा शर्माची बहीण रेणू शर्मा हिने मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली. “करुणा शर्मा यांच्यासोबत माझे २००३ सालापासून परस्पर सहमतीने संबंध आहेत,” अशी जाहीर कबुली धनंजय मुंडे यांनी १२ जानेवारी २०२१ रोजी दिली होती. तसंच करुणा यांच्यापासून दोन अपत्ये असल्याचं जाहीर केलं होतं. करुणा शर्माने अहमदनगरमध्ये सभा घेऊन पक्षाची घोषणा केली होती. शिवशक्ती सेना असं नाव सभेत जाहीर केलं होतं. तसेच शर्माने बीडच्या परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : धुळ्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT