डोळ्यांचे पारणे फेडणारा एकवीरा देवीचा चैत्री उत्सव सोहळा पार SaamTvNews
मुंबई/पुणे

डोळ्यांचे पारणे फेडणारा एकवीरा देवीचा चैत्री उत्सव सोहळा पार

यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून देवीच्या दर्शनाला भाविक आले होते.

दिलीप कांबळे

मावळ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत व कोळी, आग्री, कुणबी, सोनार आदी समाजांची कुलस्वामीनी असणाऱ्या आई एकवीरा देवीचा (Ekveera Devi) पालखी सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून देवीच्या दर्शनाला भाविक आले होते. दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात यात्रा साजरी होत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे उधाण आले होते.

हे देखील पहा :

मावळ (Maval) मधील आई एकवीरा देवीचे माहेरघर असलेल्या देवघर येथील श्री भैरवनाथ देवाच्या पालखी सोहळ्याने प्रारंभ झालेल्या कार्ला एकवीरा देवीच्या यात्रेने देवीच्या पालखी सोहळ्याच्या वेळी परमोच्च क्षण गाठला. यावेळी गडावरील अरुंद अशा जागेतही एकाचवेळी लाखो भाविकांनी एकच गर्दी केली होती. तत्पूर्वी ‘आई मी आयलो’ असा घोष करीत गडावर जाणाऱ्या आगरी कोळी भाविकांनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. आगरी कोळी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन गडावर करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT