Kapil Patil Saam Tv
मुंबई/पुणे

सत्ता गेल्यामुळे काहीही वक्तव्य करायचे याला काही अर्थ नाही; कपिल पाटलांचा पवारांना टोला

शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समिती तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले होते.

प्रदीप भणगे

डोंबिवली -  शेतकरी भूमिपुत्र अन्याय  निवारण संघर्ष समिती तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवलीत (Dombivli) करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मनसे आमदार राजू पाटील, गणेश म्हात्रे, बाबाजी पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आगरी कोळी समाजातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांसारखे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

भूमीपुत्रांनी आता आयपीएस, आयएएस अधिकारी होऊन देशाच्या जडणघडणी मध्ये योगदान द्यावे असा सल्ला यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी सांगितले की तुम्ही जो इतिहास शिकलात तोच आम्ही देखील शिकलो आहोत. त्यांनी काही वेगळा इतिहास शिकलेला असेल तर आम्हाला माहीत नाही. सत्ता गेल्यामुळे काही ही वक्तव्य करायचे याला काहीच अर्थ नाही असा अप्रत्यक्ष टोला कपिल पाटील (Kapil Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लगावला आहे. 

हे देखील पाहा -

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासात शिवाजी महाराजांवर अन्याय केला आहे. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आला पाहिजे असे वक्तव्य केले आहे. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मंत्री पाटील यांनी त्यांनी काही वेगळा इतिहास शिकलेला असेल तर आम्हाला माहीत नाही. ती उत्तुंग व्यक्तिमत्वाची लोक आहेत, त्यांच्या बाबतीत मला काही बोलता येत नाही.

आम्हाला जो इतिहास शिकवलेला आहे तो इतिहास तुम्ही , शिकलात तोच आम्ही शिकलो. त्यांनी काही वेगळा शिकलेला असेल तर आम्हाला माहीत नाही. राज्य सरकारने जी पुस्तके काढली, त्या पुस्तकातून जो इतिहास शिकवला गेला तोच इतिहास आम्हाला माहीत, बाकीचा इतिहास आम्हाला माहीत नाही.

सत्ता गेली म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांचा विषय पुन्हा आला असे वाटते का या प्रश्नावर ते म्हणाले ही सत्ता नैसर्गिक बसलेली नाही. राज्यातील जनतेने भाजपा व शिवसेनेला कौल दिला होता. परंतु सत्तेसाठी या लोकांनी न घडणारी महाविकास आघाडी घडवली. आणि भाजपाला निव्वळ सत्तेपासून बाहेर ठेवायचे हा हेतू मनामध्ये ठेवून सत्ता स्थापन केली गेली. जनमत हे सेना व भाजपा ला होते तसेच सरकार यायला हवे होते. आता त्यांचे सरकार गेल्यामुळे काही वक्तव्य करणार याला काय अर्थ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT