''बिपीन रावतांचा 'असा' मृत्यू होणं गंभीर; सरकार सर्व प्रश्नांची उत्तरं देईल'' Saam TV
मुंबई/पुणे

''बिपीन रावतांचा 'असा' मृत्यू होणं गंभीर; सरकार सर्व प्रश्नांची उत्तरं देईल''

सकाळीच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही बिपीन रावत यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले होते.

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

पुणे : काँग्रेसचे युवा नेते कन्हैय्या कुमार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यात आल्यावर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे. या पदावरच्या माणसाचा असा मृत्यू होणं गंभीर आहे. सरकार याबाबत कोणतेही प्रश्न अनुत्तरीत ठेवणार नाही अशी अपेक्षा कन्हैया कुमार यांनी व्यक्त केली आहे. सकाळीच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही बिपीन रावत यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले होते.

योगीजी मोदीजींच्या मागे धावत होते तेव्हा...

पुढे बोलताना कुमार यांनी भाजपाला टोला मारला आहे. पुणे शहराच्या विकासाची जबाबदारी असलेले लोक जहिरात करण्यात मग्न असल्याची टीका कन्हैया कुमार यांनी केली आहे. भाजपमुळे हिंदुत्व हा मुद्दा झाला आहे तर आता त्यांनी महागाई , विकास याबद्दलही बोलावं म्हणजे तोही निवडणूकीचा मुद्दा होईल अशी टीका कुमार यांनी सरकारवर केली आहे. कन्हैय्या कुमार यांनी देशातील मोदी सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले ''मला विचारले जाते की मोदींचा पर्याय काय? आपण कोरोनावर पर्याय शोधला की पर्याय शोधला? आता देशात हुकूमशहांची बैठक सुरू आहे. एक मुख्यमंत्री योगीजी मोदीजींच्या मागे धावत होते तेव्हा असं वाटत होते. देशात वन मॅन शो सुरू आहे''.

...त्यांनी काँग्रेसची ताकद समजून घेतली पाहिजे.

माझा दीदींना विरोध नाही. येथे बहुपक्षीय सरकार आहे. पण काँग्रेसला कमकुवत म्हणण्यापूर्वी एकापेक्षा जास्त राज्यात काँग्रेसचे सरकार आहे, याचा विचार करा. त्यांनी पंतप्रधान होण्याची अपेक्षा करावी, पण त्यांनी काँग्रेसची ताकद समजून घेतली पाहिजे असे उद्गार कन्हैय्या कुमार यांनी ममता बॅनर्जींच्या बाबतीत काढले. प्रादेशिक पक्षांची ताकद राज्यात असू शकते. तिथे पुर्णपणे सगळ्या जागांवर तोच पक्ष निवडून आला तरी त्यांची राज्याबाहेर ताकद नाही. तिथे काँग्रेसची तापत आहे असे कुमार म्हणाले.

पुरस्कार भीक मागून मिळतात...

कंगनाच्या आझादीच्या वक्तव्यावर देखील कन्हैय्या यांनी आपले मत व्यक्त केले. आझादी भिकेत नाही मिळत, भिकेत पुरस्कार मिळतात अशी टीका कन्हैय्या यांनी कंगना राणावत वरती केली आहे. पुढे ते म्हणाले कोण आहे कंगना? सिनेमा बनवते- पहा आणि टाळ्या वाजवा. आज संध्याकाळी ते पुण्यात काँग्रेस भवन येथे लोकशाही बचाव सभेला देखाल संभोदित करणार आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT