Kandivali chawl fire  Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Mumbai Fire : कांदिवलीतल्या चाळीत अग्नितांडव, ७ जण होरपळले, गॅस सिलिंडरच्या लिकेजमुळे उडाला भडका

Gas cylinder leakage fire incident in Kandivali : कांदिवली (मुंबई) येथील चाळीत गॅस सिलिंडरच्या लिकेजमुळे लागलेल्या आगीत ७ जण भाजले. तिघांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

Kandivali chawl fire latest news Mumbai : कांदिवलीमधील चाळीमध्ये आज सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये सात जण होरपळल्याची माहिती मिळाली आहे. सातही जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले अन् तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. सध्या आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे. गॅस सिलिंडरच्या लिकिजमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमकं कारणाचा तपास घेतला जात आहे. Gas cylinder leakage fire incident in Kandivali

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई जवळच्या कांदिवली (पूर्व) येथे मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत आज सकाळी लागलेल्या आगीत सात जण गंभीर जखमी झाले. ही आग सकाळी ९.०५ वाजता लागली होती. मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आग ग्राउंड +१ मजल्याच्या दुकानात लागली होती. घरातील वीज जोडणी, एलपीजी गॅस सिलिंडर लिकेज झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत सात जण भाजले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि समता नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

आगीमध्ये भाजलेल्या आणि जखमी झालेल्या ४ जणांना ईएससीआय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तिघांना बीडीबीए रुग्णालयात नेण्यात आले होते, पण प्रकृती नाजूक असल्यामुळे पुढील उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शिवानी गांधी, नितू गुप्ता, जानकी गुप्ता, मनराम कुमकट, रक्षा जोशी, दुर्गा गुप्ता आणि पूनम यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पूनम, दुर्गा आणि रक्षा या जवळपास ९० टक्के भाजल्या आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hill Stations: कुठं, कुठं जायाचं हनिमूनला? बेस्ट ठरतील 'हे' हिल स्टेशनस

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात अडकलेल्या दोघांना सुखरूप वाचवलं

Moong Dal Tikki Recipe: मूग डाळ टिक्की क्रिस्पी होत नाहीये? मग हा १ पदार्थ करा मिक्स

GK : एक टिव्ही चॅनल ५ चित्रपट दाखवून किती पैसे कमवतात ? जाणून घ्या

Healthy Sleeping Tips: उशी घेऊन झोपण्याची सवयी आजपासून सोडा, शरीरात होतील आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT